महावितरणचा सूशिक्षित बेरोजगार अभियंतांच्या करिअर सोबत खेळ-सागर दुधाने

सोशल

प्रतिनिधी:रितेश कान्होलकर नरखेड

महाराष्ट्र शासनाने नवीन कंत्राटदार निर्माण व्हावे व बेरोजगारांना सुरुवातीच्या काळात विनाशर्यत काम मिळून सुशिक्षित बेरोजगार अभियंते स्थिरस्थावर व्हावे यासाठी शासन निर्णय क्र. नुसार नोंदणीकृत सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना प्रतिवर्ष किमान दहा लाख रुपयाचे काम व पाच वर्षात ७५ लाख रुपयाचे काम देणे आवश्यक आहे. परंतु महावितरण नागपूर मंडळाने आपलेच मापदंड ठरवून सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या करिअरला ग्रहण लावण्याचे काम सुरू केले आहे. ज्यांची महावितरणच्या ढिसाळ नियजनामुळे ७५ लाखाच्या कामाची मर्यादा पूर्ण झाली नाही परंतु ५ वर्ष पूर्ण झाले त्यांना कामापासून वंचित केले आहे. येणाऱ्या काळात हेच महावितरण या ५ वर्ष पूर्ण केलेल्या अभियंत्यांना कामाच्या अनुभवावरून शर्यतीतून बाद करायला मागे पाहणार नाही. यावर्षी २४ नोव्हेंबरला कामाच्या लॉटरी मधे तर महावितरणने नागपूर जिल्ह्यातील १३० सू बे अभियंता यांना प्रत्येकी १ ते १.५ लाख रुपयाचे काम देऊन चुना लावण्याचा प्रकार केला व याविषयी जाब विचारला असता पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी ग्रामीणचा विकास निधी शहराला वळता केल्याचे महावितरण अधीक्षक अभियंता यांनी सांगितले. जिल्ह्यातील लोकांच्या सोयीसाठी व महवितरण सू बे अभियंता यांना काम देण्यासाठी फक्त १० कोटी ३० लाख रुपये निधी सरकार महावितरण ला देऊ शकत नाही ही सरकार साठी शरमेची बाब आहे.एकीकडे सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांना पाच वर्ष अडकून ठेवायचं आणि पाच वर्षांनंतर “घरका ना घाटका” अशी अवस्था करायची हे सूत्र सरकार सह महावितरणने कोणाच्या इशाऱ्यावरून सुरू केले आहे हे कळायला मार्ग नाही. यासंबंधी अधीक्षक अभियंता व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे व ३० नोव्हेंबर ला पुन्हा आयोजित केलेल्या लॉटरी मधे जर प्रत्येकाला १० लाख रुपयाचे काम दिले नाही तर महावितरण च्या मंडळ व पाचही विभागीय कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची तय्यारी सू बे अभियंता यांनी केली असल्याची माहिती दिली आहे. प्रसंगी सागर दुधाने यांच्यासह चेतन गुडधे, रितेश कान्होलकर, साहिल ढोकणे, राकेश वानखेडे, अमित राऊत, भूषण कुबडे, ज्ञानेश जोगी, विजय मेंढे, प्रणय ठाकरे, अंकित गवळी, सुबोध पेशने, आकाश सुरकर, रोशन शेंबेकर, मंगेश मुरलावर, अमोल भाकरे, लोकेश मस्के, श्रेयस खुजे, देवल धुळे सह १३० सू बे अभियंता उपस्थित होते.

CLICK TO SHARE