ठाणेदार चेनतसींग चौहान याना यांच्या उपस्थितीत दिली शपथ.
प्रतिनिधी:साजिद पठान नागपुर
जलालखेडा ( ता-१०) एस. आर. के. इंडो पुब्लिक स्कूल,जलालखेडा यांच्या वतीने अभिनव उपक्रम घेत निवडणुकीच्या माध्यमातुन विद्यार्थी प्रतिनिधीची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे विद्यार्थ्यंना निवडणुकीत उभे राहण्यासाठी इछुक उमेदवारांची आधी स्पर्धा परीक्षा घेण्यात आली परीक्षेमध्ये 6 मुली व 6 मुलांनी भाग घेतला. गुणांच्या आधारे 4 मुलं व 4 मुलींची निवड करण्यात आली.गुणांच्या आधारे निवडून आलेल्या विद्यार्थ्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात आले. निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रचार केला व ते सर्व उमेदवार सर्व मतदारांपर्यंत पोहचेल व त्यांनी मतदान करण्याचे आव्हान मतदारांना केले. शाळेच्या वतीने मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. विद्यार्थ्यांनि बॅलेट पेपरच्या माध्यमातुल विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधीसाठी मतदान केले. मतदान पेट्या सील करून स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आल्या. निवडणूक अधिकारी व शाळेच्या प्राचार्य यांच्या उपस्थितीत मतदान पेट्या उघडण्यात आल्या व मतदान मोजणी करण्यात आली. या निवडणुकीत मुलांमधून मंथन राऊत, शपात नवाब,यश धर्मे, पार्थ कराळे व मुलींमधून दीक्षा चौहान,आयेशा शेख, लेकीता ठाकरे,चैताली अंतुरकर उभे होते. मुलांमधून पार्थ कराळे 125 मत मिळवत विजयी झाला तर नोटाला 12 मतदान मिळाले. तर मुलीनं मधून चैताली अंतुरकर 157 मत मिळवत विजयी झाली नोटाला 15 मतदान मिळाले.तसेच हाऊस प्रतिनिधी सुद्धा निवडण्यात आले. यामध्ये रेड हाऊस प्रतिनिधी मंथन राऊत, प्रभारी म्हणून तनिष्का बावणे,यश धर्मे, ग्रीन हाऊस प्रतिनिधी धनश्री कराळे, प्रभारी लावण्या रुद्रकार,आयेशा शेख,ब्लू हाऊस प्रतिनिधी शपाथ नवाब, प्रभारी दीक्षा चौहान, लेकीता ठाकरे, येल्लो होऊस प्रतिनिधी समीक्षा राठोड, प्रभारी वेदांत जाणे, नव्या वर्मा यांची निवड करण्यात आली. शाळेत कार्यक्रमाचे आयोजन करून निवडणूक आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी व हाऊस प्रतिनिधी याना पदाची व गोपनीयतेची शपत ठाणेदार चेतनसिंग चौहान व प्राचार्य शुभांगी अर्डक यांच्या उपस्थितीत देण्यात आली. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळी :- नव्याने निवडून आलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधी ठाणेदार चेतनसिंग चौहान व प्राचार्य शुभांगी अर्डक यांच्या सोबत.
बॉक्स,
निवडणूक प्रक्रियेचा अवलंब करून शाळेत विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधीची निवड शाळेच्या वतीने करण्यात आली. शाळेत असे उपक्रम राभवने गरजेचे आहे.शाळेतील विद्यार्थ्यंनमध्ये असलेली शिस्त चांगली असून या मागे शिक्षकांच मोठं योगदान आहे. लोकशाही मूल्याचे धडे शाळेतून दिले त्यामुळे प्राचार्य व शिक्षकांचे अभिनंदन. चेतनसिंग चौहानठाणेदार जलालखेडा.