राज्यस्तरीय ज्युनिअर अँथलेटिक्स स्पर्धेत पी.आर.डी.स्पोर्ट्स ब्रह्मपुरी च्या विद्यार्थ्यांची निवड

खेल

जिल्हा प्रतिनिधी:विभा बोबाटे गडचिरोली

चंद्रपूर :- महाराष्ट्र अँथलेटिक्स असोसिएशन अंतर्गत चंद्रपूर जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशन द्वारा दिनांक १९ ते २२सेप्टेंबर २०२४ ला पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जूनियर अँथलेटिक स्पर्धेची निवड चाचणी आज दिनांक १०/८/२०२४ शनिवार ला जिल्हा क्रीडा स्टेडियम, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते यामध्ये १४,१६,१८,२०,२३ वर्षातील मुला मुलींचे रनिंग ,लांबउडी , उंचउडी , गोळाफेक थाळीफेक, भालाफेक, अन्य प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये २० वर्षाआतील वयोगटात 400 मीटर रनिंग स्पर्धेत कुमारी. जान्हवी दिलीप हजारे हीने उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकाविला तर १६ वर्षाआतील वयोगटात कुमारी. समीक्षा राऊत हिने 600 मीटर रनिंग स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला तर ट्रायथलॉन ( बी )या क्रिडा स्पर्धेत 14 वर्ष आतील मुलींच्या गटात कुमारी.माही अवसरे हिने प्रथम क्रमांक पटकावला तर कुमारी.गोजिरी दोनाडकर हिने द्वितीय क्रमांक पटकावला   14 वर्ष आतील मुलांच्या गटात ट्रायथलॉन (बी ) या क्रीडा स्पर्धेतकुमार. समृद्ध वैरागडे याने उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकावला तर कुमार. शशांक बांबोळे याने तृतीय क्रमांक पटकावला  तर ट्रायथलॉन (सी ) या क्रिडा स्पर्धेत 14 वर्ष आतील मुलांच्या गटात कुमार. प्रेम डोंगरवार याने दुतीय क्रमांक पटकावला तर कुमार. विहान भोयर याने तृतीय क्रमांक पटकावला सर्व खेळाडूंनी आपल्या विजयाचे श्रेय पालक व पी.आर.डी. स्पोर्ट्स, ब्रह्मपुरी चे संचालक राहुल जुआरे सर, क्रीडा सहप्रशिक्षक कुंदन गायकवाड सर, स्नेहा राऊत मॅडम यांना दिले.

CLICK TO SHARE