प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा
चंद्रपूर :- वरोरा शहरातील रहिवासी तलाठी विनोद खोब्रागडे यांची मुलगी डॉली विनोद खोब्रागडे हिने नुकत्याच झालेल्या इंग्रजी विषयात उत्तीर्ण केली राज्य शासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यामध्ये डॉली हिने प्रथम प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण केली ट्रॉली सध्या एल एल बी द्वितीय वर्षाला असून लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत आहे. या मिळालेल्या यशासाठी तिने आपले वडील तलाठी विनोद खोब्रागडे, आई अनुताई, भाऊ विवेक आदींना दिले आहे. तिला मिळालेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.