प्रतिनिधी:साजिद पठान नागपुर
काटोल : काँग्रेसने सत्तर वर्षे मुस्लिम बांधवांची फक्त दिशाभूल केली. प्रत्यक्षात मात्र काहीच दिले नाही.मोदीजींनी मुस्लिम बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असून भारतीय जनता पक्षाने ‘सबका साथ सबका विकास’ हे उद्दीष्ठ ठेवून सर्वांच्याच उत्थानासाठी कार्यरत असल्याचे प्रतिपादन चरणसिंग ठाकूर यांनी केले.काटोल – नरखेड विधानसभा प्रमुख चरणसिंग ठाकूर यांनी काटोल येथे मुस्लिम महिला भगिनींशी संवाद साधला.मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाची भूमिका यावेळी ठाकूर यांनी समजावून सांगितली.चरणसिंग ठाकूर म्हणाले की,काँग्रेस पक्ष मुस्लिम बांधवांमध्ये भ्रम (गुमराह) पसरविण्याचे काम करत आहे.पण मोदी सरकारने मात्र मुस्लिम समाजाची प्रगती होईल यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत.जशे की तीन तलाक विरुद्ध कायदा आणून मोदींनी मुस्लिम भगिंनीची पिडा कमी केली.मदरशातील मुलांना अद्ययावत शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करून त्यांना लॅपटॉप देण्याचा निर्णय घेतला. EWS अंतर्गत १० टक्के आरक्षण शिक्षण आणि लोकहित बहाल केले. ए पी जे अब्दुल कलाम योजने अंतर्गत अनेक चांगल्या गोष्टींची तरतूद केली.सर्वांसोबत मुस्लिम समाजाचीही प्रगती व्हावी हाच भाजपचा विचार आहे. सरकारने ज्या काही योजना आणल्या त्यात कुठेही भेदा-भाव केला नाही.लाडकी बहिण योजनेत मुस्लिम भगिनींना समान संधी,घरकुल योजनेचा मुस्लिम कुटुंबाला लाभ,मुस्लिम कुटुंबाला दर माह मोफत राशन देतांना भेदभाव केला जातो का असे सवाल उपस्थित करत शंका समाधान केले.उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम बांधवांना मोठ्या प्रमाणात घरं दिली,नागपूर शहरातही घरे आणि सगळी कडे सर्वत्र योजनांचा लाभ सर्वांनाच दिला जातो असे ठाकूर यांनी सांगितले.प्रत्येक समाजात चांगले – वाईट लोक असतात. त्यामुळे एखाद्याने चुकीचे वक्तव्य केल्याने त्या संपूर्ण समाजाची बदनामी होणे चूक आहे.अशा चुकीच्या लोकांकडे दुर्लक्ष करून सलोखा जपण्याचे काम भाजप करते.जर कोणत्याही समाजाच्या एकाद्या व्यक्तीने भडकाऊ व चुकीचे वक्तव्य केल्यास आपण आपल्यातील सलोखा बिघडवू न देता आपली, कुटुंबाची प्रगती कशी होईल हा विचार केला पाहिजे.तोच मोदींचा विचार असल्याचे सांगून आपल्यासाठी बजेटमध्ये काय तरतूद केली आहे?कोणती योजना आली आहे? याचा अभ्यास करणे अधिक चांगले असल्याचे ठाकूर यांनी म्हटले.पूर्वी आपल्या देशाची आर्थिक स्थिती जगात दहाव्या क्रमांकावर होती पण आता मोदींच्या नेतृत्वात आपण इतकी प्रगती घेतली आहे की २०४७ पर्यंत आपला देश विश्वाचे नेतृत्व करेल. नितीन गडकरी यांनी रस्ते विकासात फार मोठी कामगिरी केल्याचे सांगत पूर्वीच्या आणि आताच्या नागपूरच्या सौंदर्यात किती फरक दिसतो असे प्रतिपादन ठाकूर यांनी केले.तसेच काटोल – नरखेड विधानसभेतील कोणीही व्यक्ती विकासा पासून वंचित राहू नये यासाठी आपण कटीबद्ध असून घरकुल योजना असो किंवा कोणतीही विकास योजना असो यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्नशील राहू असे अभिवचनही त्यांनी दिले.