प्रतिनिधी :- शारुखखान पठाण, वरोरा,
चंद्रपूर :- वरोरा तालुक्यातील पाचगाव येथील जनार्दन सिताराम शेंडे, वासुदेव सिताराम शेंडे, शंकर बबन केदार या तीनही शेतकऱ्यांच्या गोठ्याला लागलेल्या आगीत एक बैल मृत पावला तर अन्य जनावरे जखमी झाले. शेती उपयोगीसाहित्य, अवजारे यांचे अतोनात नुकसान झाले. हि घटना दि. 11 ऑगस्ट रात्रीच्या सुमारास घडली. पाचगाव येथील जनार्दन सिताराम शेंडे, वासुदेव सिताराम शेंडे, शंकर बबन केदार यांचे गोठे एकमेकाला लागून आहे. रात्री दिड वाजताच्या सुमारास शेकोटीमुळे जनार्दन शेंडे यांच्या गोठ्यातील बांधलेल्या 4 बैलांपैकी 1 बैल या आगेमुळे मरण पावला तर 1 जखमी झाला. गोठ्यातील शेती उपयोगी अवजारे जनावरांचा चारा असा अंदाजे दीड लाख नुकसान झाले. तर वासुदेव सिताराम शेंडे यांच्या गोठ्यातील जनावरे रात्रीला बांधून होते. मात्र अचानकपणे लागलेल्या आगीमुळे यांचे बैल जखमी झाले. तर शेती उपयोगी अवजारे जनावरांचा चारा असे 2 लाखांचे नुकसान झाले. शंकर बबन केदार यांचा गोठा दोन्ही गोठ्याला लागून असल्याने आगीने तीव्र रूप धारण करीत गोठ्यातील जुने लाकडी, शेती अवजारे, रासायनिक खते असा 70 हजाराचे सामान जळून खाक झाले. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांना माहिती त्यांनी त्वरित फोनद्वारे तहसीलदार योगेश बा. कौटकर यांनी अग्निशामन दलाला माहिती दिली. दाखल होतात अग्निशामन घटनास्थळी दाखल होताच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र या 3 ही शेतकऱ्यांचे पशुहानी झाली एवढेच नव्हे तर या आगेत कोठ्यातील ठेवलेल्या साहित्यांची, खतांची, साऱ्याचे आगीमुळे अतोनात नुकसान झाले. एक महिन्यापासून सतत सुरू पावसामुळे हवालदिल झालेला शेतकरी या संकटात सापडल्याने आता करावे तरी काय या मनस्थितीत शेतकरी असून या शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळवून देण्याचे आश्वासन शेतकरी नेते किशोर डुकरे यांनी दिले आहे.