यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लिपुर येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा

एज्युकेशन

तब्बल 38 वर्षांनी फुलला मैत्री बंध मळा

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

वर्ष निघून जातात , जात नाही त्या आठवणी 38 वर्षापूर्वी जिथे अध्यापन कौशल्याचे धडे घेतले त्या हिंगणघाट तालुक्यातील यशवंत विद्यालय अल्लिपुर येथे 1986 मध्ये दहाव्या वर्ग बॅचच्या विद्यार्थ्यांनी भाऊ बंधाची जपवणूक केली. माजी विध्यार्थी व माजी सेवानिवृत्ती शिक्षकांनी एकत्र येऊन दिनांक 11ऑगस्ट ला स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला. या निमित्याने जुण्या आठवणींना उजाळा दिला.38 वर्षाचा मोठा कालखंड लोटल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या नोकरी धंद्यात गोतावळ्यात व्यस्त असल्याने सहजासहजी एकत्र येणे शक्य होत नाही. मात्र ते अशक्यही नसते हे अल्लिपुर यशवंत विद्यालयामधील 1986 सालि दहावी उत्तीर्ण होऊन गेलेल्या विद्यार्थ्यांनी व माजी सेवानिवृत्ती शिक्षकांनी दाखऊन दिले.गावातील सवंगडी , शाळेचा वर्ग , लाकडी बाक याची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते शाळा सोडल्यावर पुन्हा त्याच लाकडी बाकावर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच माजी वीध्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्याने 38 वर्षांनी शाळेतील मस्ती , एकत्रीपने केलेला अभ्यास शिक्षकांचा वचक, क्रीडा स्पर्धा , शिक्षकांनी दिलेली शिक्षा , स्नेहसम्मेलन कार्यक्रमाची धूम इत्यादी विषयावर माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जूण्या आठवणींना उजाळा देत ओघातच आपण इतके मोठे झालो याचे क्षणभर विस्मरण झाले. काळाच्या ओघात माजी विद्यार्थ्यांच्या भेटीगाठी प्रसंगी गप्पाचे फड रंगू लागले होते त्यातूनच दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी रियुनियन म्हणजेच आयोजित स्नेहमेळावा पहिलीते दहावी पर्यंत सोबत शिक्षण घेतलेले सहमित्र विद्यार्थी आज राजकारण , उद्योग , शिक्षण , प्रशासन , सामजिक अशा अनेक व्यवसायात काम करीत असुन त्यांनी आपल्या कामाचा उंच ठसा उमटवला आहे. काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून त्यावेळच्या गुरूंचे स्मरण करून जुन्या स्मुर्ती जागवल्या. सर्वांच्या चेहऱ्यावर 38 वर्षापूर्वीच्या बालपणीचा काळ शिरल्याचा भाव होता . माध्यमिक शिक्षण पुर्ण करुन जीवनाच्या वाटांनी यश मिळविण्यासाठी बाहेरगावी निघालेले मुल मुली आपल्या प्रपंच्यात असतांना एकत्र आले यात गृहिणी , इंजिनियर , प्राध्यापक , अधिकारी , व्यावसायिक , व सामजिक क्षेत्रात काम करणारे तरुण नेतृत्व म्हणून कार्यरत आहेत. सदर स्नेहमीलन सोहळ्यात प्राचार्या स्मिता ढोकणे मॅडम अध्यक्ष होत्या तर प्रमूख पाहुणे माजी सेवानिवृत्त शिक्षक मिरापुरकर सर , साळवे सर , गोमासे सर , वाळके सर , कातोरे सर , गावंडे सर, चव्हाण मॅडम , दलाल मॅडम शिक्षकेत्तर माजी कर्मच्यारी दिलीप लांभाडे माजी जिल्हा परषद अध्यक्ष नानाभाऊ ढगे माजी विद्यार्थी सतीश ढगे , गजनान मुडे , वैद्य , कांबळे , सतीश डफ , सुनिल देवलकर , राजू गुप्ता , जमील कुरेशी , शुभांगी पांडे , वाघमारे , घटूर्ले ताई , वर्षा डफ , भारती वरघणे व इतर सर्व माजी विध्यार्थी तसेच शाळेतील शिक्षक भोयर सर , समर्थ सर , अंड्रस्कर सर, शिक्षकेत्तर कर्मचारी वैद्य , राऊत उपस्थीत होते

CLICK TO SHARE