भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

अन्य

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली : वसमत येथे आज पत्रकार परिषद झाली त्यामध्ये. 15 ऑगस्ट 2024 गुरुवार भारताचा 77 व स्वातंत्र्य दिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सलग अकराव्या वेळी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर झेंडा फडकवतील हा क्षण भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात विक्रमी व दुसऱ्या वेळी होत आहे याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टी प्रदेश सहसंयोजक मिलिंद राजकुमार यंबल 17 सप्टेंबर 2024 रोजी भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्ताने राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यातआली आहे यामध्ये स्पर्धेचे नियम व अटी 18 वर्षे ते पंचवीस वर्ष. शब्द मर्यादा कमान 500 शब्द. निबंध मातृभाषा मराठीत असावा. ए 4 रजिस्टर रेषा असलेल्या पानावर सु वाच्छअक्षरात लिहिलेला असावा. पानाच्या एका बाजूला निबंध असावा. वयाचा पत्त्याचा व नावाचा पुरावा म्हणून आधार कार्ड ची दोन्ही बाजूची झेरॉक्स लावावी. निबंध वैयक्तिक खाली दिलेल्या पत्त्यावर आणून द्यावे, किंवा पोस्टाने पाठवावे. सर्व अधिकार आयोजकाकडे राखून राहील.आपल्या निबंधामध्ये प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी भारताच्या केलेला विकास तसेच आगामी कालखंडात भारतातील पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) अर्थकारण संरक्षण सामाजिक न्याय,क्रीडा, कृषी,आत्मनिर्भर भारत,विज्ञान तंत्रज्ञान,यावर आपल्या युवकांचा असलेला अपेक्षा सूचना निबंधा मार्फत नरेंद्र मोदी यांच्याकडे पोहोचवल्या जातील या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 21000 व मेडल, द्वितीय पारितोषिक 15000 व मेडल, तृतीय पारितोषिक 11000 व मेडल, उत्तेजनार्थ पाच पारितोषिक प्रत्येकी 1000 रुपये व मेडल,असे ठेवण्यात आले आहे. निबंध स्वीकारण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2024 ही राहील.

CLICK TO SHARE