इंदुरा सी.बी.एस.ई.मध्ये स्वतंत्र्यदिन साजरा

एज्युकेशन

प्रतिनिधि:अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली:- वसमत तालुक्यातील सी बी एस. ई. बोर्डाची मान्यता असणाऱ्या एकमेव इंदुरा इंग्लिश स्कूल मध्ये 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सेवा निवृत्त सुभेदार श्री. लिंबाजी मारोती गोरे यांना आमंत्रीत करण्यात आले होते. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सुभेदार गोरे साहेबांनी वि‌द्यार्थ्यांना सैन्यातील विविध अनुभव सांगीतले.शाळेतील 45 वि‌द्यार्थ्यांनी भाषणातून आपले मनोगत व्यक्त केंले व देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिला- संस्कृतीक विभाग प्रमुख श्री. लिंबाळकर सर यांनी विविध वाद्यांच्या सहाय्याने गीत गायण व कलाकृतीचे सादरीकरणे केले. सुभेदार गोरे साहेबांनी मनोगतातून शाळा राबवत आसलेल्या नवनविण उपक्रमाबद्दल, माजी सैनिकांना दिलेल्या सन्माना बद्दल गौरोउद्गार काढले व शाळेच्चा पुढिल वाटचालीस शुभेच्छा दिल्या.शाळेने स्वातंत्र्यदिना निमत्ताने घर घर तिरंगा, सेल्फी विथ तिरंगा , चित्रकला स्पर्षा, आशा विविध उपक्रमात सहभाग नोंदवला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अंजुम मॅडम, परिणीती वानखडे व हर्षिका पांडे यांनी केले. प्री प्रायमरी च्या विद्यार्थ्यांनी विविध फळाची माहिती व उपयोगिता सादर केली कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, उप प्राचार्य व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

CLICK TO SHARE