स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

एज्युकेशन

हिंगणघाट ब्यूरो चीफ

हिंगणघाट तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा वाघोली (न.)येथे गावातीलच युवक भीमसेन (शुभम) गोटे व सर्व मित्र परिवार यांनी आज दि. 15 ऑगस्ट, 2024 रोजी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परंपरा कायम राखत स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करत विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित केला.सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडेश्वर वानखेडे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. वादन पथकाच्या गजरात गावात फेरी मारण्यात आली. यानिमित्त इशानी नितेश काळे या तिसरीच्या विद्यार्थिनीने उपस्थित विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शैलीत मार्गदर्शन करून सर्व उपस्थितांना मोहित करून घेतले. त्यावेळी मंचावर अध्यक्ष, मुख्याध्यापक – सुनील सुके, प्रमुख अतिथी – गिरजाताई बावणे सदस्या ग्रा. प. वाघोली, मार्गदर्शक – प्रेमदासजी गोटे तथा संजयजी बावणे, कमलाकर चौरे, नामदेव वानखेडे, शंकर बावणे, मनोज कळणे, शुभम गोटे (महासचिव, हिंगणघाट तालुका युवक काँग्रेस) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नितेश काळपांडे तर आभार अंगणवाडी सेविका रंजना राडे यांनी मानले. यशस्वितेसाठी मदतनीस कमला भरणे, पालकवर्ग तसेच उपस्थित गावकऱ्यांनी सहकार्य केले.

CLICK TO SHARE