कोलकत्ता येथील महिला डॉक्टरवरील अमानवीय कृत्याचा निषेध

सोशल

वसमत येथील सर्व डॉक्टर संघटने मार्फत एक दिवसाचा लाक्षणिक संप

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली:वसमत येतील आज कोलकत्ता येथील आर. जी. कार मेडिकल कॉलेज मधील पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या महिला डॉक्टरवर अमानवीय कृत्य करून तिचा निर्घणपणे खून केल्याप्रकरणी आणि तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी तेथील सर्व पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने हजारो गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जमून तेथील हॉस्पिटल व होस्टेलवर हल्ला करून हॉस्पिटल आणि हॉस्टेलची मोडतोड करून बऱ्याच डॉक्टरांना जखमी केल्या प्रकरणी, देशातील सर्व डॉक्टर्सनी शनिवारी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला यात वसमत च्या डॉक्टरांनी ही सहभाग नोंदवलाया अतिशय निर्घण आणि अमानवीय कृत्याचा निषेध करण्यासाठी वसमत येथील सर्व डॉक्टर संघटना, आय.एम.ए,निमा, होमिओपॅथी, डेंटल आणि लॅब असोसिएशन ने एकत्रितपने शनिवार सकाळी सहा वाजल्यापासून संप सुरु करुन सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथुन मूक मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आलेसदर प्रकरणाची तात्काळ निष्पक्ष सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांकडून पारदर्शक तपास करून फास्ट ट्रॅक कोर्टाने निकाल लावून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आणि डॉक्टरांवरील होणारे सततचे हल्ले थांबवण्यासाठी कडक केंद्रीय आरोग्य संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी तज्ञ समितीची स्थापना आणि हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांच्या चांगल्या संरक्षणासाठी पूर्णपणे कार्यरत सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुसज्ज सुरक्षा रक्षक यासारख्या सुरक्षा उपायांमध्ये सुधारणा करणे, तसेच वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयात पीजी रहिवाशांसाठी योग्य ऑन-कॉल रूम आणि वसतिगृहे प्रदान करण्याची मागणी निवदेणातून करण्यात आलीरविवारी सकाळी सहा वाजे पर्यंत शहरातील सर्व हॉस्पिटल चालकांनी ओपीडी आणि आयपीडी सेवा बंद ठेवून निषेध नोंदवला दरम्यान रुग्णांना फक्त तातडीच्या सेवा देण्यात आल्याया संपात सर्व डॉक्टर,मेडिकल व आरोग्य क्षेत्रातील लोकांनी सहभाग नोंदवला उपस्थितांचे इंडियन मेडिकल असोसिएशन,वसमत डॉक्टर असोसिएशन ने आभार मानले

CLICK TO SHARE