महाविकास आघाडीच्या सत्तेत दांडेगावकरांना सन्मानाचं पद देऊ -जयंत पाटील

अन्य

शिव स्वराज्य यात्रेचे वसमतला जल्लोषात स्वागत

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

आगामी काळात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका महाविकास आघाडीसाठी अनुकूल ठरणार असून या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार असून सरकारमध्ये माजीमंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना सन्माननाचे पद देण्याची ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली . राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे आयोजित “लढा स्वाभिमानी महाराष्ट्राचा जागर शिवस्वराज्य विचारांचा” हे संकल्प घेऊन निघालेली शिवस्वराज्य यात्रेची शेवटची सभा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संसदरत्न खासदार अमोल कोल्हे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारोंच्या साक्षीने शनिवारी सायंकाळी वसमत येथे पार पडलीया वेळी व्यासपीठावरुन जयंत पाटील बोलत होतेपुढे बोलतांना पाटील म्हणाले की मागील काळात महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच गोष्टी घडून गेल्या आहे. जयप्रकाश दांडेगावकर व मा.शरदचंद्रजी पवार यांच्या आशीर्वादामुळे एक आमदार इथे निवडून आले.पण आमदाराने साथ सोडली,आता त्या आमदारांमध्ये जय ही राहिला नाही आणि प्रकाशही राहिला नाही दांडेगावकर या भागाच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील राहिले आहे. मी जलसंपदा मंत्री असताना दांडेगावकर इथल्या पाण्याच्या प्रश्नासाठी सतत पाठपुरावा करत होते. आपण ते काम मार्गावर आणले. ही लोकप्रतिनिधीची आणि नेतृत्वाची ओळख असते.आज आपली लढाई भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध विचारांविरोधात आहे. आपल्याकडे फुले, शाहू,आंबेडकर यांच्या विचारांची ताकद आहे आणि त्याच विचारांना पुढे नेण्यासाठी आपण लढणार आहोत.मराठा आरक्षणा बाबत भूमिका स्पष्ट करण्याबाबत सकल मराठा समाजाने दिलेल्या पत्रा संदर्भात बोलतांना पाटील म्हणालेमराठा आरक्षणावर सरकार जो सकारात्मक निर्णय घेईल त्यास आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. निर्णय त्यांच्या हातात आहे. आम्ही विरोधी पक्षात आहोत. दांडेगावकरांनी नेहमीच तरुणांना संधी दिली आहे. मात्र बहुजन समाजाचा विचार टिकवण्यासाठी दांडेगावकर सारख्या भिष्माचार्याने पुन्हा एकदा धनुष्य हाती घेण्याची गरज आहे. महाविकास आघाडीच्या सत्तेत सन्माननीय पद देण्याचा नक्कीच प्रयत्न करू अशी ग्वाही जयंत पाटलांनी उपस्थित जन समुदायास दिली. सभेचे संचलन प्रकाश इंगळे,यल्लपा मिटकर यांनी केले

CLICK TO SHARE