प्रतिनिधी:सचिन वाघे हिंगणघाट
हिंगणघाट :-सकल हिंन्दू समाजाच्या वतीने रविवार दी.18 ला सकाळी 11 वाजता कारंजा चौक येथून भव्य मोर्चा काढण्यात आला. बांगलादेशात हिंदू बांधवांवर केलेल्या अत्याचार विरोधात भारत सरकारने अतिशय तीव्र नोंद घ्यावी, अशी मागणी या मोर्चातून करण्यात आली.बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार, स्त्रियांवर अत्याचार, हिंदूंचे घर जाळण्याचे प्रकार होत आहे.ही चिंतेची बाब असून भारत सरकारने या विषयात बांगलादेशासंदर्भात कठोर पावले उचलावीत.तसेच कलकत्ता येथे महिला डॉक्टरवर अत्याचारकरून तिची निर्मम हत्या करण्यात आली आहे याघटनेचाही निवेदनातून निषेध करण्यात आला.महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यात सुद्धा बांगलादेशी, रोहिंग्याची संख्या वाढलेली असून हिंगणघाट शहरात शासकीय जागेवर अतिक्रमण करून हे वास्तव्यास आहेत. शहरातील टाका ग्राउंड, कवडघाट रोड, निशानपुरा रोड व अन्य शासकीय ठिकाणी त्यांचे वास्तव्य आहेत. या सर्व गोष्टी दुर्लक्षित करण्यासारख्या नसून हा धोक्याचा इशारा असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.या सर्व गोष्टी दुर्लक्षित करण्यासारख्या नसून हा धोक्याचा इशारा असल्याचेही उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मोर्चात सकल हिंदू धर्मीय, हिंदू जागरण मंच, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, शिव पर्व हिंदुस्थान, व्यापारी असोसिएशन, रोटरी क्लब,राष्ट्रीय स्वयंम सेवक संघ.शहरातील विविध हिंदूवादी संघटनांचा समावेश होता. सदर निवेदन पंतप्रधान, मुख्यमंत्री, गृहमंत्री, आय. बी. गुप्तचर विभागालाही पाठविण्यात आली आहे.