आरमोरी शिवम कॅफेच्या सेल्सपर्सनला मारहाण करणारे सोहेल व अयुब फरार, दोघांवर गुन्हा दाखल

सोशल

जिल्हा प्रतिनिधी:विभा बोबाटे गडचिरोली

आरमोरी: आरमोरी शहरातील शिवम कॅफे, टी पॉइंट आरमोरी-वडसा रोडजवळ स्थित आहे, तिथे सोहेल मेहमूद शेख आरमोरी आणि अयुब शेख (ड्रायव्हर) आरमोरी या दोघांनी मिळून कॅफेच्या महिला सेल्सपर्सनला दिवसाढवळ्या मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तथापि, गुन्हा दाखल झाल्यानंतर सोहेल आणि अयुब दोघेही फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत आणि लवकरात लवकर त्यांना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून, पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

CLICK TO SHARE