शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
दि.19/08/2024 बल्लारपूर: देशात सतत घडत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटना पाहत महिलांच्या मनात भिती तसेच चीड भावना निर्माण होत आहे. अश्यावेळी शिवरायांची सर्व स्त्रियांना आठवण होते. शत्रूच्या घरच्या स्त्रियांनादेखील आई-बहिणींसमान मानणाऱ्या त्या विचारांची आज गरज आहे असा विचार व्यक्त करत आम आदमी पार्टी बल्लारपूर शहर महिला आघाडीने शिवरायांना राखी अर्पण करून कोलकता महिला डॉक्टर मोमीता हत्याकांडातील आरोपिंना फासावर चढविण्यात यावे व अश्या आरोपींसाठी कठोर कायदा व्हावा अशी मागणीदेखील AAP तर्फे करण्यात आली. अश्या घटना पुन्हा पुन्हा घडू नये याकरिता देशातील मोदी सरकार असो, प.बंगाल मधील ममता सरकार असो की कोणतेही राज्य सरकार असो सर्वांनी याकडे लक्ष घातले पाहिजे असे देखील आपतर्फे मागणी करण्यात आली. यावेळेस शहर महिला अध्यक्ष किरण खन्ना ,शहराध्यक्ष रविभाऊ पुप्पलवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रा.नागेश्वर गंडलेवार, शहर उपाध्यक्ष अफजल अली व गणेश सिलगमवार, संघटनमंत्री रोहित जंगमवार, प्रवक्ता आसिफ शेख, मनीषा अकोले, गणेश अकोले, संगीता तोडे, प्रिया झामरे, स्नेहा गौर, मयुरी तोडे, अनिता करमंकर, सौरभ चौहान, साहिल, बुशरा शेख, रेखा भोगे, निशा नंदवंशी, तसेच सर्व महिला कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.