प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली
अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय,वसमत येथील विद्यार्थिनींनी आज दिनांक 20 ऑगस्ट 2024 रोजी कलकत्ता येथील तरुणी महिला डॉक्टर वर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ गुन्हेगारांना शिक्षा व्हावी या करिता मा.उपविभागीय अधिकारी,वसमत यांच्या कडे भव्य रॅली द्वारे निवेदन दिले.कलकत्ता येथील तरुणी महिला डॉक्टर वर झालेला अमानुष अत्याचार हा मानव जातीला काळीमा फासणारा असून यातील गुन्हेगारांना कठोरात कठोर अशी फाशीची शिक्षा व्हावी जेणे करून या पुढे असे कृत्य करण्याचे धाडस कुणी करू नये अश्या भावना विद्यार्थिनींनी निवेदनाद्वारे व्यक्त केल्या.या वेळी मुख्याध्यापिका सौ.सरिता शिवाजीराव पतंगे,श्री मिटकर एलाप्पा, विद्यार्थिनी कामखेडे यांनी मनोगते व्यक्त केली.या विद्यार्थिनी रॅलीत जवळपास दोन हजार विद्यार्थिनींचा समावेश होता.