तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
स्थानीक यशवंत प्राथमिक शाळा अल्लिपुर येथे स्काऊट गाईड अंतर्गत कब बुलबुल पथकातर्फे 20 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला पोलीस देशात व समाजात शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचे काम निरंतर करीत असतात आपल्या रक्षणाची जबाबदारी आपण त्यांच्यावर सोपवतो आणि म्हणून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अल्लीपूर येथील पोलीस स्टेशन येथे ठाणेदार डाहुले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरजुसे साहेब व इतर कार्यरत पोलीस बांधव व पोलीस दिदी यांना चिमुकल्या कब बुलबुलांनी राख्या बांधल्या यावेळी पोलीस मित्र म्हणून भूमिका समजावून सांगताना विद्यार्थ्यांनी कोणतीही अडचण आल्यास न घाबरता आमची मदत घ्या असे सुरजुसे साहेबांनी सांगितले अतिशय आनंददायी वातावरणात रक्षाबंधन कार्यक्रम पोलीस स्टेशनमध्ये पार पडला तसेच कब बुलबुल पथकातर्फे यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य ढोकणे मॅडम व सर्व शिक्षकांना शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना राख्या बांधण्यात आल्या सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका फ्लॉकलीडर नंदुरकर मॅडम कब मास्टर कैलास नागरे सर दिनेश काळे सर बाळासाहेब पाटील सर कोपरकर मॅडम साळवे मॅडम यांनी परिश्रम घेतले यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.