प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली जिल्ह्यातील उपजिल्हा अधिकारी कार्यालय वसमत येथे भीम आर्मीचे धरणे आंदोलन करण्यात आले, सुप्रीम कोर्टाने SC.ST. मागासवर्गीय मागास असलेल्या प्रवर्गाला मूळ प्रवाहात आणून त्यांचा विकास करणे हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधानात तरतूद करून त्यांना आरक्षण दिले होते परंतु त्या दिलेल्या आरक्षणाला व संविधानाला छेडछाड करू आरक्षण वर्गीकरण करून मागासवर्गीय समाजावर अन्यायकारक निर्णय दिला हा निर्णय चुकीचा दिला असून त्या अनुषंगाने भीम आर्मी भारत एकता मिशन हिंगोली जिल्ह्याच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले याप्रसंगी भीम आर्मी जिल्हा मार्गदर्शक बी.एन.मस्के सर, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड, भीम आर्मी तालुकाध्यक्ष सुभाष इंगोले, तालुका मार्गदर्शक नितीन जाधव, राजू गायकवाड, राज जोंधळे, मनोज इंगोले, देवानंद मुळे, अर्जुन पानपट्टे, राजू केवटे, आनंद जोंधळे, राजकुमार सावंत, लक्ष्मण ठोके,आटकोरे सुरज, आतिश गायकवाड, रितेश करवंदे, बबलू कांबळे, अरुण जाधव. शेकडो कार्यकर्त्याच्या उपस्थितीमध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या. 1)अनुसूचित जाती जमाती आणि मागास असलेल्या प्रवर्गाला आरक्षण कोट्यामध्ये समाविष्ट करून घ्यावे 2) खाजगी संस्थांमध्ये आरक्षण व्यवस्था लागू करावी 3) जोपर्यंत एस .सी. एस .टी. ओ.बी.सी. चा कोठा भरला जाणार नाही तोपर्यंत संविधाना मध्ये कसलाही प्रकारचा बदल करता कामा नये करू नये, ह्या मागण्याचे आंदोलन करून निवेदन देण्यात आले.