चरणसिंग ठाकूर यांच्या विश्वासाने रोषण काळे यांचे उपोषण मागे

सोशल

दोषींवर कारवाई करीता पाठपुरावा करणार

प्रतिनिधी:साजिद खान नागपुर

काटोल:दिनांक २७ नोव्हेंबर २०२३नरखेड तालुक्यातील बरडपवनीं येथील रहिवासी बाबाराव काळे यांना प्रधानमंत्री आवास योनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेले घरकुर ग्राम पंचायतीने रद्द केले. वारंवार यासमंधाने विविध अधिकार्यांची भेट घेऊन सुद्धा उडवाउडवीची उत्तरे मिळाली.प्रशासनाला कंटाळून लाभार्थीचा मुलगा रोशन बाबाराव काळे याने दिनांक २६.११.२०२३ पासून ग्राम पंचायत समोर आमरण उपोषण सुरू केले होते.काटोल नरखेड विधानसभा प्रमुख तथा कृ. ऊ.बा.समिती काटो लचे सभापती चरणसिंग ठाकूर यांनी भेट घेतली ,संपूर्ण घडलेल्या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचा विश्वास वडील बाबाराव काळे आणि सौ.नलिनी राऊत यांना दिला.आणि रोषणचे उपोषण शरबत पाजून मागे घेतले.याप्रसंगी नरखेड तालुका प्रमुख दिलेश ठाकरे,मोहनराव मातकर,राजेंद्र पोतदार,सुरेशराव पोतदार,दीपक पोतदार,विजय गांधी,अशोक काळे,किशोर पुंड,लीलाधर भड,नाना मानकर,अक्षय विरखरे,मयूर दढारे,उपस्थित होते.

CLICK TO SHARE