बाबाराव गोरे असे मारहाण करणाऱ्या ग्राम सेवकाचे नाव.मिना देविदास चव्हाण असे महिला कर्मचाऱ्याचे नाव जलालखेडा ग्राम पंचायत येथील घटना.
प्रतिनिधी:साजिद पठान नागपुर
जलालखेडा (त.21) गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र महिलांवर अत्याचार,मारहाणीचे प्रकरण मोठ्या प्रमाणात होत आहे.नरखेड तालुक्यातील जलालखेडा येथील ग्राम पंचायतमध्ये सफाई महिला कामगाराला ग्राम सेवकाने मारल्याची घटना बुधवारी सकाळी 10.15 वाजता ग्राम पंचायत कार्यालयात घडली मिनाबाई चव्हाण वय वर्ष 51 रा.जलालखेडा असेन मारहाण करण्यात आलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याचे नाव आहे तर बाबाराव गोरे असे मारहाण करणाऱ्या ग्राम सेवकाचे नाव आहे बुधवारी सकाळी 10.15 वाजता सफाई कामगार महिला कामावर ग्राम पंचायतमध्ये आली असता ग्रामसेवक बाबाराव गोरे स्वतःच्या चार चाकी वाहनाने ग्राम पंचायत कार्यालयात आले व महिला सफाई कामगारला गाडीतील बॅग घेण्यास सांगीतले महिला कर्मचारी बॅग घेवून कार्यालयात आली असता बॅग मधील पिशवी खाली पडल्याने ग्राम सेवकाने महिला कर्मचाऱ्याला (तेरा वजन बढ गया है तेरा वजन कम कर) असे म्हटले असता सफाई कर्मचारी यांनी साहेब तुम्ही असे कसे म्हणता अस तुम्हाला बोलायचं अधिकार नाही असे म्हटले असता ग्राम सेवकाने महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ केली असल्याचे महिला कर्मचारी यांनी सांगितले.तसेच तुझ्या कडून जे होते ते करून घे असे ग्राम सेवकाने महिला कर्मचाऱ्याला म्हटले.तसेच पाठीवर उजव्या हाताने महिला कर्मचाऱ्याला मारहाण करून विनयभंग केला असल्याची तक्रार महिला सफाई कर्मचारी यांनी पोलिस स्टेशन येथे दिली.महिला कर्मचारी यांनी दिलेल्या तक्रारी वरून जलालखेडा पोलिसांनी ग्रामसेवक बाबाराव गोरे यांच्या विरुद्ध कलम 74,296 (ब),115 (1),351 (2) सहकलम 3 (2) (विअ), 3(2) (ii), 3(1) (आर) नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उप विभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम करत आहे.याच जलालखेडा ग्राम पंचायत कार्यालयात घडली घटना.