शिवपुरी येथून मोटरसायकल रॅली काढून असेगाव येथे आढावा बैठक संपन्न

अन्य

प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली:- वसमत येथील असेगाव येथे माननीय आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर भाषण करताना ते म्हणाले की. हे आहे सामान्य माणसाचं प्रेम..रक्त पिऊन नाही रक्त देऊन.. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्कल कार्यकर्ता आढावा बैठक आसेगाव सर्कल, आसेगाव येथे हजारो कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने पार पडले.. यावेळी कार्यक्रत्याच्या आग्रहास्तव आमदार राजूभैय्या नवघरे यांची उपस्थिती संबोधित करताना डागली विरोधकावर तोफ.. याप्रसंगी अध्यक्ष स्थानी विश्वनाथ गारुडे माजी संचालक पुर्णा सहकारी साखर कारखाना, सभापती तानाजी बेंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष जिजाराव हरणे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग जिल्हा अध्यक्ष गौतम दवणे,राजुभैय्या नवघरे सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बालूमामा ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष त्र्यंबक कदम, सचिन भोसले उपसभापती, युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष आदित्य आहेर,वैजनाथ भालेराव माजी पं.स.उपभापती तथा विद्यमान संचालक, छत्रपती जाधव, संचालक विश्वनाथ फेगडे, संचालक ज्ञानेश्वर बेंडे, संचालक गजानन सवंडकर, संचालक रमेश मानवते, संचालक राजू चव्हाण, संचालक संजय चिंतारे,माजी संचालक प्रशांत शिंदे, अरविंद खराटे,बालाजी जाधव, कपिल सोनटक्के, सचिन कापुसकरी उपस्थित आसेगाव, मर्लापूर,सुनेगाव, दगडपिंपरी, हिवरा खु.,रुंज,गुंज, इंजनगाव पुर्व पश्चिम, टाकळगाव, कन्हेरगाव, पळसगाव येथील उपस्थित सरपंच, उपसरपंच चेअरमन,व्हाॅईस चेअरमन, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते.सर्वांनी एकमताने आमदार राजूभैय्या नवघरे यांच्या सोबत राहण्याचा संकल्प केला..

CLICK TO SHARE