जागतिक स्मरण दिन साजरा राष्ट्रीय महामार्ग जाम केन्द्राचा उपक्रम

सोशल

प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर

राष्ट्रीय महामार्ग केंद्र जाम समुद्रपुरचे वतीने जागतिक स्मरण दिन रवींद्र सिंघल, अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक), यशवंत सोळंके पोलिस अधीक्षक, महामार्ग प्राधिकरण विभाग, नागपूर यांचे मार्गदर्शनात सुरू असलेल्या रस्ते अपघातातील पीडित व्यक्तीच्या स्मरणार्थ जागतिक स्मरण दिन सप्ताह अंतर्गत 06 महिन्या आधी झालेल्या अपघातात दुखापत होवुन सध्या मृतक असलेला 1) दिनेश सुधाकर वाटकर वय 40 वर्ष रा. माडंगाव, तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा 2) कुणाल ज्ञानेश्वर बावणे वय 23 रा. माडंगाव, तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा झालेल्या अपघाता मुळे त्यांचे घरी जावून घरा समोर भेट घेतली तसेच आलेल्या समस्या बाबत विचारपूस करण्यात आली.उपस्थित गावकरी यांना वाहतुकीच्या नियमां बाबत प्रबोधन करून वाहतुकीच्या नियमा बाबत पत्रके वाटण्यात आली, यावेळी गावातील युवक मंडळीसह शेकडो गावकरी प्रामुख्याने उपस्थित होते. या सर्वानी वाहतूक नियमाचे पालन करुन महामार्गावर होणा-या अपघाताला कसे कमी करता येईल यासाठी वाहने, सुरक्षित कसे चालवावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले .:

CLICK TO SHARE