राज्यस्तरीय अँथलेटिक्स निवड चाचणीत भारत फिजिकल अकॅडमी आरमोरी च्या विद्यार्थ्यांचे यश

खेल

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

गडचिरोली :- महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन अंतर्गत गडचिरोली जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन द्वारा आज दिनांक २५ /८/२०२४ रविवार ला एम.आय.डि.सी. ग्राउंड कॉम्प्लेक्स एरिया येथे सकाळी ७:०० वाजता आयोजित मैदानी स्पर्धेत २० वर्षातील मुलींच्या गटात भारत फिजिकल अकॅडमी, आरमोरी ची विद्यार्थिनी कुमारी. चारुलता हिवराज तिजारे हिने २०० मीटर दौड स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करत प्रथम क्रमांक पटकाविला तर १८ वर्षातील मुलींच्या च्या गटात कुमारी.वेदिका मनोज बोरकर हीने द्वितीय क्रमांक पटकावित १९ सप्टेंबर २०२४ ते २२ सप्टेंबर २०२४ ला पुणे येथील बालेवाडी क्रीडा संकुल येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे विद्यार्थ्यांनी आपल्या विजयाचे श्रेय पालक व भारत फिजिकल अकॅडमी,आरमोरी चे संचालक मा.महेंद्र मने सर यांना दिले आहे.

CLICK TO SHARE