प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा
चंद्रपूर :- शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर येथे महसूल दिनाचे औचित्य साधून दि. 24 ऑगस्ट रोजी सातबारा मधील सर्व घटक तसेच सातबारा हे दिवाणी फौजदारी, महसूल विभागामध्ये कशाप्रकारे उपयोगी पडतात याबद्दल सविस्तर माहिती विधी शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तहसील कार्यालय भद्रावती अनिल शृंगारे यांनी सातबारा विषयीचे व्यवहारिक शिक्षण विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात कशाप्रकारे देता येऊ शकते हा विचार धारणेनुसार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एजाझ शेख यांनी हा उपक्रम विधी महाविद्यालयामध्ये केला असून सातबारा दस्तऐवज या विषयावर विशेष कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली होती. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी डॉ. अवय बुटले सर उपस्थित होते विशेष उपस्थिती म्हणून विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एजाझ शेख सर तसेच प्राध्यापक डॉ. मार्गवी डोंगरे होत्या कार्यक्रमाला विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. पवन गुजर यांनी केले तर सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी अजाझ , जुनेद यांनी केले कार्यक्रमातील वक्त्यांचे आभार ऍड. प्रिया पाटील यांनी केले या कार्यक्रमास विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी,जनमान्य उपस्थित होते.