वडनेर येथे संविधान जनजागृति अभियानाचे यशस्वी आयोजन

सोशल

प्रतिनिधी सूनिल हिंगे अल्लिपुर

स्थानीक वडनेर येथे संविधानदिना निमित्याने भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले व पुष्पहार अर्पण करुन जि.प. प्राथमिक शाळा विद्यार्थीनी संविधानाची प्रस्तावना व उद्देशिका वाचन करण्यात आली याप्रसंगी सर्व नागरिकांनी संविधानाचे अधिकार माहिती रॅलीचे माध्यमातून वडनेर गावात जनजागृति करण्यात आली कार्यक्रमाला प्रामुख्याने वर्धा जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस गुरुदयाल जुनी, महेंद्र महाजन, पंढरी शिवणकर, विजु ढोक, माजी पोलीस पाटील, वाल्मीक महाजन, गजानन जारोंडे, चोकोबाजी कुंभारे, सुरेश भगत, दीपक शिवणकर, प्रशांत दरोडे, मनोज कळसकर, मुन्ना माने सर, शाळेतील सर्व विद्यार्थी तसेच गावकरी पुरुष महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.↓

CLICK TO SHARE