शिक्षकांनी उद्याचा चांगला नागरिक घडवणे ही काळाची गरज आहे,मुख्यधिकारी बोरीकर

अन्य

प्रतिनिधी:साजिद पठान नागपुर

नागपुर:काटोल शिक्षकांनी उद्याचा चांगला नागरिक घडवणे ही काळाची गरज आहे मुख्याधिकारी बोरीकर नुकतीच बदलापूर येथील लहान मुलीवर अतिप्रसंग घडला त्यात सर्व देश हळहळ व्यक्त करीत आहे याचे पडसाद पुढे घडू नये म्हणून काटोल नगरपरिषद अंतर्गत कुंतलापूर ज्ञानार्जन केंद्र काटोल येथे सर्व मुख्याध्यापक व शिक्षक शिक्षिका यांची मीटिंग मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मेश्राम सर ठाणेदार पोलीस स्टेशन काटोल नगरपरिषद काटोलचे शिक्षणाधिकारी इंगळे सर तसेच कुंतलापूर ज्ञानार्जन केंद्राचे ग्रंथपाल राजेंद्र राऊत, सुचिता चौधरी उपस्थित होत्या याप्रसंगी मुख्याधिकारी धनंजय बोरीकर साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनात शिक्षकांचे कार्य हे फक्त शिकविण्याइतकेच नसून आजच्या बदलत्या काळानुसार शिक्षकांनी अपडेट राहिले पाहिजे आधीच्या काळी मुलं व मुली बोलताना दिसत नव्हत्या परंतु आज च्या बदलत्या काळात मुलं मुली आपल्याला सर्रास बोलतानी दिसतात परंतु त्यांच्या मैत्रीत असते असे नाही तर त्यांच्याबद्दल व त्यांच्या एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असेल हे सुद्धा पाहणे शिक्षकांचे कर्तव्य आहे सीसीटीव्ही लावल्यावर फक्त हे झालेल्या घटनाचे कव्हरेज करू शकत परंतु भावनांचा कव्हरेज होऊ शकत नाही म्हणून आपण सुद्धा अपडेट राहायला पाहिजे त्याच बरोबर समुद्र वरून किती शांत दिसला तरी त्याच्या आत मध्ये अनेक तुफान दडलेले असतात म्हणून आपण विद्यार्थ्यांच्या प्रती व कर्मचाऱ्यांच्या प्रतीही सतर्क राहणे ही आपली जबाबदारी आहे.तसंच शिक्षकाचे महत्त्वाचे कार्य म्हणजे उद्याचा चांगला नागरिक घडवणे आहे असे ते बोलत होते तर ठाणेदार मेश्राम साहेब यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिक्षकाला आपल्या शाळेत हुशार मुलगा कोणता व गद्दू मुलगा कोणता व शाळेत मस्ती कोण करतो व कोण करीत नाही याची भान असते त्यामुळे शिक्षकांना मुलांवर चांगलं लक्ष ठेवण्यास जास्त वेळ लागत नाही आजच्या युगात मोबाईल विद्यार्थ्यांमध्ये जास्त वापर आहे त्यामुळे अभ्यासात जास्त लक्ष न देता अनेक ॲप कडे वळत आहेत त्यामुळे त्यांच्यामध्ये अनेक बदल पहावयास मिळतात तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांसोबत बोलायला पाहिजे त्यांच्या अडचणी ऐकून घेणे व कोणी तसे आढळल्यास त्यांना अटकने म्हणजे तो पुन्हा तसे करणार नाही व त्यांना वाटल की आपल्याकडे ही शिक्षकांचे लक्ष असते त्यामुळे ते पुन्हा मोबाईल कडे वळणार नाही यापुढे पोलीस प्रत्येक शाळेत जाऊन शाळेत कार्याचा आढावा सुद्धा घेणार आहे व शाळेत समिती सुद्धा स्थापन करायची आहे प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसवणे अतिशय आवश्यक आहे परंतु ती तिथे तक्रार टाकत असताना कोणालाही आपण तक्रार टाकतो असे दिसणार नाही कारण काही मुले तक्रार करण्यात भीत असतात म्हणून दिसणार नाही अशा ठिकाणी तक्रारपेटी लावायची आहे तसेच सखी सावित्री समिती स्थापन करायची आहे प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा लावणे बंधनकारक आहे व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या नियुक्ती बाबत घ्यावयाची काळजी विद्यार्थी की सुरक्षा समिती स्थापन करणे इत्यादी प्रकारची माहिती त्यांनी दिली कार्यक्रमाचे संचालन मानकर सरांनी केले तर आभार प्रदर्शन इंगळे सर यांनी केले

CLICK TO SHARE