केळीच्या तीन हजार झाडांवर अज्ञात इसमाने तणनाशक फवारून अकरा लाखाचे नुकसान केले

क्राइम

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली

हिंगोली वसमततालुक्यातील दिग्रस खुर्द येथील शेतकरी गणेश साहेबराव मोकळे यांनी आपल्या अडीच एकर शेतामध्ये केळीचे 3800 झाड जवळपास नऊ महिन्यांपूर्वी लावले होते त्यापैकी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अंधाराचा फायदा घेऊन अडीच एकर केळीच्या बागेमध्ये तणनाशक फवारणी केली असून 3800 केळीच्या झाडापैकी 3000 तणनाशक फवारल्यामुळे नाचून गेली असून केळी उत्पादक शेतकरी गणेश मोकाळे यांच्या तोंडात आलेला घास हिरावून गेल्यामुळे त्यांचे जवळपास 11 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे केळी उत्पादक शेतकरी गणेश मुकाळे यांनी सांगितले आहे.वसमत तालुका हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून वसमत तालुक्यामध्ये परराज्यातील व्यापारी केळी खरेदी करण्यासाठी वसमत तालुक्यामध्ये येत असतात सध्या केळीला 2400 ते 2500 रुपये प्रति क्विंटल भाव असून एखाद्या वेळेसच इतका प्रचंड भाव केळीसाठी आला आहे त्यामध्ये अशाप्रकारे कोणीतरी अज्ञाताने तणनाशक फवारून नुकसान केल्यामुळे गणेश मोकाळे यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याकारणाने ते अत्यंत तणावांमध्ये असून शासनाकडून शक्यतो नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करत आहेत. पार्डी खुर्द च्या तलाठी एम आर ढगे मॅडम यांनी आज पंचनामा करून शासनाकडे त्वरित अहवाल पाठऊन शक्यतो लवकरात लवकर सदरील शेतकऱ्यास न्याय मिळून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

CLICK TO SHARE