सभापती अँड सुधिरबाबु कोठारी यांची संकल्पना प्रत्यक्षात साकार

सोशल

हिंगणघाट बाजार समितीचा नाविन्यपूर्ण उपक्रम सोलर झटका बॅटरी वाटप सोहळा देवळी मतदार संघाचे विकासपुरुष आमदार रणजीतदादा कांबळे यांचे हस्ते संपन्न

सभापती अँड सुधिरबाबु कोठारी यांची संकल्पना प्रत्यक्षात साकार

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर

संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांसाठी विविध व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या हिंगणघाट बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांना वन्यजीवापासुन शेतमालाचे रक्षण करण्यासाठी ५०%अनुदानावर हिंगणघाट व समद्रपुर तालुक्यातील एकुण एक हजार शेतकऱ्यांना सोलर झटका बॅटरीचे वितरणाचा पहिला ३०० बॅटरी वाटपचा टप्पा देवळी पुलगाव मतदारसंघातील गावांतील शेतकरी बांधवांना विकास पुरुष लोकप्रिय आमदार श्री रणजीतदादा कांबळे यांचे हस्ते हिंगणघाट बाजार समितीच्या कानगाव उपबाजार येथे पार पडला. या प्रसंगी प्रामुख्याने हिंगणघाट मतदारसंघाचे माजी आमदार श्री राजुभाऊ तिमांडे, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड सुधिरबाबु कोठारी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शशांक भाऊ घोडमारे, वर्धा बाजार समितीचे सभापती अमितभाऊ गावंडे, देवळी बाजार समितीचे सभापती मनोजभाऊ वसू, वर्धा बाजार समितीचे उपसभापती पांडुरंगजी देशमुख, समुद्रपुर बाजार समितीचे सभापती श्री हिम्मतरावजी चतुर,देवळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अमोलभाऊ कसनारे, राका हिंगणघाट तालुकाध्यक्ष विनोदभाऊ वानखेडे, राका कामगार सेल जिल्हाध्यक्ष आफताब भाई खान,राका हिंगणघाट शहराध्यक्ष विठ्ठलभाऊ गुळघाणे,हिंगणघाट बाजार समितीचे अध्यक्ष दिगांबररावजी चांभारे, उपाध्यक्ष राजुभाऊ भोरे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष हरीशभाऊ काळे, नांदगाव (कानगाव) ग्रामपंचायत सरपंच सौ.वाघमारे ताई, कानगाव ग्रामपंचायत सरपंच खासरे ताई हिंगणघाट बाजार समितीचे उपसभापती हरीशभाऊ वडतकर ,संचालक मधुसूदनजी हरणे, मधुकरराव डंभारे,ओमप्रकाशजी डालिया, उत्तमराव भोयर, अशोकराव उपासे,राजेशजी मंगेकर, डॉ निर्मेशजी कोठारी, प्रफुलभाऊ बाडे, घनश्यामजी येरलेकर, पंकजजी कोचर, ज्ञानेश्वरराव लोणारे, शुभ्रबुद्धजी कांबळे, सौ.माधुरीताई माधवराव चंदनखेडे, सौ.नंदाताई दिगांबरराव चांभारे, हर्षदजी महाजन,संजयभाऊ कात्रे, माजी संचालक सुरेशभाऊ सातोकर,हिंगणघाट नगर परीषदेचे माजी नगरसेवक धनंजयभाऊ बकाने,अनिलभाऊ भोंगाडे,राका जिल्हा महासचिव जितुभाऊ सेजवल,तेजसभाऊ तडस इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर स्वागत समारंभ पार पडला. यावेळी बोलतांना आमदार रणजीतदादा कांबळे यांनी हिंगणघाट बाजार समिती ही संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श असुन या समितीद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रम हे शेतकऱ्यांकरीता अत्यंत उपयोगी असल्याचे सांगितले. ५०% अनुदानावर सोलर झटका बॅटरीचे वितरण हा अत्यंत प्रेरणादायी उपक्रम असल्याचे सांगितले. यावेळी माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शशांकजी घोडमारे,स्वतंत्र भारत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मधुसुदनजी हरणे इत्यादी मान्यवरांनी बोलतांना या उपक्रमाची प्रशंसा केली.हा शेतकरी उपयोगी उपक्रम शेतकऱ्यांना अत्यंत लाभदायक असल्याचे सांगितले.यावेळी प्रास्ताविक करतांना हिंगणघाट बाजार समितीचे सभापती अँड. सुधिरबाबु कोठारी यांनी सोलर झटका बटरी उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.तसेच हिंगणघाट बाजार समितीचे वतीने हिंगणघाट समुद्रपुर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीना स्मशानभूमी येथे 10 बेंचेस देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपकभाऊ माडे यांनी केले तर आभार प्रदर्शन जेष्ठ संचालक मधुकरराव डंभारे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रामुख्याने गौरवभाऊ ओंकार, नामदेवराव तळवेकर, भुजंगराव चिखलकर, अजयभाऊ बाळसराफ, पुरुषोत्तमजी भोयर,किरणभाऊ ठाकरे, प्रफुल्लभाऊ फुकट,विष्णुभाऊ कामडी,प्रमोदभाऊ येंगडे, समिरभाऊ शेख, अनिलभाऊ बुकने,संदिपभाऊ फरताडे, राजुभाऊ धोबे, हरिभाऊ ठाकरे व बाजार समितीचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने तालुक्यातील शेतकरी बांधव व मोठ्या प्रमाणात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.हिंगणघाट बाजार समितीच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.

CLICK TO SHARE