तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरनी बातमीची शहानिशा करून दोशिवर कार्यवाही करा-मनसे चे निवेदन

अन्य

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

ब्रम्हपुरी:- तालुक्यातील नदीकाठावरील एका शालेय विद्यार्थिनीवर त्याच शाळेतील शिक्षक असलेल्या संस्थाचालकांने अत्याचार केल्याचे प्रकरण प्रसारमाध्यमातून पुढे आल्याने सदर प्रकरणाचा योग्य तपास करून आलेल्या बातमीची शहानिशा करून दोशी व्यक्तीवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनर्माण सेनेचे ब्रम्हपुरी तालुकाध्यक्ष सूरज शेंडे यांनी निवेदनातून केली आहे राज्यात काही दिवसांपूर्वी बदलापूर येथे घडलेल्या शालेय अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण व तिथे घडलेले आंदोलन मुळे संपूर्ण राज्यात या प्रकरणी उद्रेक व तणावाचे वातावरण पहावयास मिळत आहे.सदर बदलापूर प्रकरण ताजे असतानाच दिनाक 26 ला प्रसिद्धी मध्यामामध्ये “ब्रह्मपुरी तालुक्यातही दुसरे बदलापूर “अशी मनाला हादरून सोडणारी एक बातमी प्रकाशित झाली आहे. सदर ची घटना ही ब्रम्हपुरी तालुका नाही तर संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याला कलंकित करणारी शरमेने मन खाली घालणारी घटना आहे . सदरच्या बातमीमुळे शालेय विद्यार्थीनी शाळेत असुरक्षित असल्याचे पालकांमध्ये भीती व संताप दिसत आहे.प्रसार माध्यमातून प्रकाशित बातमी मध्ये उल्लेखित घटना ही तालुक्यातील नदीकाठावरील एका शाळेतील असून मागील दोन वर्षापासून घडत असल्याचा उल्लेख असल्याने हा प्रकार फार गंभीर असून पालकांची चिंता वाढवणारा आहे.प्रकाशित बातमी मध्ये सदर घटना प्रत्यक्ष कोणत्या शाळेतील आहे हे स्पष्ट दिसत नसले तरीही प्रकाशित बातमी मध्ये अनेक पुरावे दिले आहे. प्रकाशित बातमी वरून बातमी प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीला या घटनेची पुरेपूर माहिती असल्याचे स्पष्ट दिसत आहे सदर गंभीर प्रकरणात जबाबदार पोलीस प्रशासनाने प्रकाशित बातमीतील अधिक माहिती घेऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे.अशा घटना ब्रह्मपुरी तालुक्यात पुन्हा घडू नयेत या बातमीच्या आधारे किंवा या बातमी मध्ये कितपत सत्यता आहे हे लोकांना कळण्याचा अधिकार आहे म्हणून आपल्या विभागाकडून लवकरात लवकर चौकशी करून यातील दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. योग्य चौकशी न झाल्यास मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सूरज शेंडे यांनी आपल्या निवेदनातून केले आहे.

CLICK TO SHARE