आजारी महिलेच्या उपचारासाठी नागपुर येथील एम्स रुग्णालयात शिवसेना जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांनी केली व्यवस्था व आर्थिक मदत

सोशल

सदैव मदतीसाठी तत्पर अशी ओळख असलेल्या राकेश बेलसरे यांच्या संवेदनशीलतेचा पुन्हा परिचय

जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली

आष्टी:आष्टी येथील मायाबाई भोयर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी चंद्रपूरला नेण्याची डॉक्टरनी सूचना केली. मायाबाई भोयर यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांना तातडीने शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. व उपचारासाठी आर्थिक मदत दिली. तसेच मायाबाई भोयर यांची प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना चन्द्रपूर येथुन नागपुर येथे हलविण्यास सांगण्यात आले. असलेल्या राकेश बेलसरे यांना कळताच त्यांनी प्रकृतीची विचारपूस करून नागपूर येथील एम्स रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था केली व त्यासाठी आर्थिक मदतही केली. तसेच आष्टी गावातील दानशूर व्यक्तींनी सुध्दा आर्थिक मदत केली.गोरगरिबांच्या संकटकाळी धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांची गडचिरोली जिल्ह्यात ओळख आहे. ते नेहमीच गोरगरीब सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जात असतात. त्यांनी रुग्णांना मोफत रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिल्याने अनेक गंभीर अपघातग्रस्त व आजाराने ग्रस्त रुग्णांना तातडीने गडचिरोली व चंद्रपूर येथे हलविण्याची सोय झाली त्यामुळे कित्येकांचे प्राण वाचले आहे. संकटकाळी मदतीसाठी धावणारा देवदूत अशी ओळख असणाऱ्या शिवसेना जिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी आपल्या व्यक्तीमत्वाचा परिचय पुन्हा एकदा करून दिला आहे. राकेश बेलसरे यांनी केलेल्या मदतीबद्दल कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले

CLICK TO SHARE