प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली वसमत :वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा येथील तलाठी कार्यालयात फेरफार प्रलंबित राहण्याच्या कारणावरून तलाठ्याचा डोळ्यात मिरचीपुड टाकून चाकूने भोसकून खून झाल्याची घटना बुधवारी ता. 28 दुपारी 12.30 वाजता घ डली आहे. संतोष पवार असे तलाठ्याचे नाव असल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत.याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत तहसील कार्यालयांतर्गत संतोष पवार हे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना आडगाव रंजेबुवा व बोरीसावंत हे दोन तलाठी सज्जे देण्यात आले आहेत. मागील 3 वर्षांपासून ते या सज्याचे काम पाहत होते. तलाठी संतोष पवार आज सकाळी हे नेहमी प्रमाणे अडगाव रांजेबुवा तलाठी सज्जा कार्यालय येथेकार्य करित बसले होते. दुपारी. 12 ते साडे 12 वाजन्याच्या सुमारस बोरी रिव्थ येथिल एक युवा दुचाकी वर ऑफिस आला यावेळी त्याने तलाठी पवार यांच्याशी फेरफारावरून बाचाबाची करन्यास सुरवात केली। पोटामध्ये वार झाल्यामुळे तलाठी पवार घाबरले अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे जागेवरच कोसळले. त्यानंतर युवाने दुचाकी वरून आल्यापावली प्रसार झाला या घटने नंतर घटना घटनास्थळी एकच गोंधळ सुरु झाला तो एकून गावकऱ्यांनी तलाठी सज्जाच्या दिशेनेधाव घेतली. गावकऱ्यांनी तलाठी पवार यांना उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात नेले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी जाहीर केले. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह हट्टा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली आहे.या बाबत पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून प्रलंबित कामावरून हा प्रकार घडला असावा अशी शक्यता व्यक्त केली. मात्र अद्याप या घटनेचे नेमके कारण समोर आले नाही.