युवक व्यसनमुक्त झाल्यास खऱ्या अर्थाने गुरुनानक जयंती साजरी केल्याचे समाधान होईल-चरणसिंग ठाकूर

सोशल

प्रतिनीधी:साजिद खान नागपुर

काटोल:दि. 27.11.2023दिवसें दिवस तरुणाई ही मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होत आहे. त्याचाच परिणाम हा कौटुंबिक परिस्थितीवर होत आहे. अशा परिस्थितीत सिख सांप्रदायातील युकांनी जर कोणी व्यसन करीत असेलतर त्याचा त्याग करावा तरच खऱ्या अर्थाने गुरुनानक जयंती साजरी केल्याचे समाधान होईल असे प्रतिपादन काटोल कृ.ऊ.बा.समितीचे सभापती चरणसिंग ठाकूर यांनी केले. ते रामठी व दावसा (बेडा) येथे गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. पुढे म्हणाले की गुरुद्वारामध्ये समाज प्रबोधन जनजागृती कार्यक्रम साजरे करावेत त्याकरिता जेकाही सहकार्य लागेल ते मी सदैव करत राहील.यावेळी कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक अशोक काळे, नरखेड मंडळाचे अध्यक्ष दिलेश ठाकरे, तुफानसिंग भादा, चंदासिंग बावरी, कैलासिंग बावरी, शेरसिंग बावरी, कुंदनसिंग बावरी, सुलतानसिंग बावरी, सुनीलसिंग बावरी, सुभाषसिंग बोंड, जयसिंग बावरी, नानाभाऊ मानकर व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CLICK TO SHARE