तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेत श्री गुरु महाराज आदिवासी विद्यालय येनिकोनी येथील खो खो स्पर्धेत अव्वल

खेल

प्रतिनिधी राहील शेख काटोल

काटोल:काटोल जिल्हा परिषद नागपूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नरखेड तालुका स्तरीय खो खो स्पर्धा दिनांक 28/08/2024 ला जीवनविकास विद्यालय देवग्राम तह नरखेड जिल्हा नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती. या क्रीडा स्पर्धेत आमच्या शाळेतील 14 वर्षा खालील मुले व मुली तसेच 17 वर्षाखालील मुली यांनी सहभाग नोदविला होता. स्पर्धेअंती नरखेड तालुक्यातील तिन्हीही संघांनी प्रथम क्रमांक मिळविला. त्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री गावंडे सर व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी क्रीडा शिक्षक श्री काळे सर व विजयी संघांचे अभिनंदन केले. व पुढील जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

CLICK TO SHARE