प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली : वसमत तालुक्यात पिकाचे अतोनात नुकसान झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट यांच्याकडून झालेल्या पिकावरील रोगाचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी याच्या अनुषंगाने आज तहसील कार्यालय वसमत येथे निवेदन देण्यात आले.दुषित वातावरणामुळे वसमत तालुका परिसरातील सोयाबीनचे नुकसान झाल्यामुळे त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी तालुक्यामध्ये धुकीच्या वातावरणामुळे व रोगराईमुळे व पावसाच्या अनियमिततेमुळे सोयाबीन पिकाचे आतोनात नुकसान झाले असून शेतकरी हतबल झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या सोयाबीनचे त्वरीत पंचनामे करून त्यांना शासकीय मदत द्यावी. आपल्या स्तरावरून तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि अधिकारी, विमा कंपनी व संबंधीत अधिकाऱ्यांना शासकीय आदेश देवुन नुकसानग्रस्त पिकांचे त्वरीत पंचनामे करण्याची व्यवस्था करावी.आपल्या कार्यालयातंर्गत वसमत तालुका परिसरातील नुकसानग्रस्त सोयाबीनची पाहणी करून पंचनामे करण्यात यावे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट तालुका अध्यक्ष दौलत व्यंकटराव हुंबाड. मुळे पाटील.