तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपूर्
संत भोजाजी महाराज मंदिर परिसर हिरवागार होऊन दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना थंडगार सावलीची शिलता मिळावी व मंदिर परिसरात मुबलक प्रमाणात प्राणवायू निर्माण होऊन वसुंधरेचे संरक्षण व्हावे, या साठी विश्वस्त मंडळ व देवस्थान प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न होत आहे,संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्व सांगतांना, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे!पक्षीही सुस्वरे!आळविती!येणे सुख रुचे एकांताचा वास! नाही गुंणदोष! अंगी येती!! हा अतिशय सुंदर असा अभंग मांडला आहे, वृक्ष केवळ आपले जीवनच प्रभावीत करतात असे नव्हे तर ते आपले अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी संजीवनी प्रदान करतात,कार्बन डायऑकसाईड सारखे विषारी वायू शोषून घेऊन आपल्याला प्रणावायू प्रदान करतात, आजनसरा हे तीर्थक्षेत्र संत भोजाजी महाराजांना प्रसाद म्हणून अर्पण करण्यात येणाऱ्या पुरणपोळीच्या स्वयंपाकाचे स्थळ असल्यामुळे या स्थळी येणारे भाविक भक्त स्वयंपाकासाठी जळाऊ लाकडाचा उपयोग करतात, त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळावेव परिसरात शितलता निर्माण होऊन वसुंधरेचे संरक्षण व्हावे या उद्देशाने 30 ऑगस्ट ला संत भोजाजी महाराज महाराज मंदिर परिसरात विश्वस्त मंडळाच्या मार्गदर्शनात देवस्थानचे अंतर्गत सुरक्षा अधिकारी रमेश पुसदेकर, वसुधैव कुटुंबकम सेवार्थ दवाखाना व्यवस्थापक डॉ.संदीप लोंढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतीक येणोरकर,यांच्या हस्ते दीर्घाआयुषी असणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली.यावेळी देवस्थान कर्मचारी सुरज ठाकरे, अविनाश जवंजाळ, उमेश बेताल, समिर देऊळकर, प्रशांत ब्राम्हणे, साहिल थुल, रोशन धनाडे, रोशन पढाल, बालू पाटीलशुभम लोंढे यांची उपस्थिती होती.