बहिर्जी स्मारक विद्यालयात सेवा गौरव समारंभ संपन्न झाला

अन्य

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली

वसमत बहिर्जी स्मारक विद्यालय येथे आज दि. 31/08/2024 रोजी बहिर्जी स्मारक विद्यालयातील संस्कृत विषयशिक्षक श्री जे.एस.कराड सर यांचा सेवा गौरव कार्यक्रम संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा. अॅड. श्री रामचंद्रजी बागल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. पंडितराव देशमुख सर, विद्यालयाचे आदरणीय मुख्याध्यापक श्री प्रवीण शेळके सर, मा. उपमुख्याध्यापिका श्रीमती के. जी. भोसले मॅडम, मा. मुख्याध्यापक श्री एन. एस. जाधव सर, मा. श्री बालाजीराव गुजराथी सर, मा. श्री बी. के. सावळे सर (मुख्याध्यापक ब.स्मा.वि.वापटी) आणि सत्कारमूर्ती ‘श्री व सौ. कराड सर’ व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील पर्यवेक्षक श्री आर.व्ही.बारसे सर, श्रीमती जे. टी. देशमुख मॅडम, मा. श्री आशीष अशोकसा पवार (नगरसेवक), श्री एस.एन.गडगिळे सर आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री प्रवीण शेळके सर यांनी मनोगत व्यक्त केले. श्री प्रवीण शेळके सर यांनी स्वमनोगत व्यक्त करीत म्हटले की, “माझा एक सैनिक आज माझ्या सैनिक-चमूतून कमी होत आहे. ज्यामुळे मी चिंतीत होत आहे की, यापुढे विद्यालयातील वाढत्या विद्यार्थी संख्येला मी शिक्षकवर्गाची पूर्तता कशी करू ? अशा चिंतित स्वरात सर पुढे म्हणाले की, कुटुंब प्रमुख या नात्याने मला संपूर्ण शालेय शैक्षणिक कार्यक्रमाचे यथोचित व्यवस्थापन करावेच लागत आहे. यात माझ्या सर्व सहकारी शिक्षक समूहाची तारेवरची कसरत होत असतांना दिसून येत आहे. अशाप्रकारे श्री प्रवीण शेळके सरांनी चिंता व्यक्त करीत सत्कारमूर्ती श्री व सौ. कराड दाम्पत्याला कंपित-आवाजात उर्वरित सुखी जीवनाबद्दल शुभेच्छा दिल्या.” सदरील कार्यक्रमासाठी श्री कराड सरांचे बंधू श्री संजय कराड व भासा श्री नितिन गीते हे गावाकडून आले होते. तर संस्थेच्या वेग-वेगळ्या शाखांमधील व अन्य शाळांमधील अनेक शिक्षकमित्र, आप्त, तसेच शहरातील श्री कराड सरांचे परमस्नेहीजन प्रतिष्ठित लोकं, प्रसिध्द व्यापारी श्री भारत यल्लुसा पवार, श्री अशोक पवार, श्री व सौ. संजय पवार, श्री व सौ. मंगेश भारतसा पवार, श्री व सौ. आशीष अशोकसा पवार, श्री व सौ. श्रीधरराव लोंढे साहेब, प्रा. श्री रामराव शिंदे सर, श्री विठ्ठलराव मुंढे साहेब, प्रा. निवृत्तीराव बांगर सर इत्यादी अनेक निवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचीही बहुसंख्येने उपस्थिती होती. तसेच विद्यालयातील पर्यवेक्षक श्री आर. व्ही. बारसे सर, पर्यवेक्षिका श्रीमती एस. व्ही. जाधव मॅडम, पर्यवेक्षक श्री सी.एस. आडकेकर सर, सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. मा. अॅड. श्री रामचंद्रजी बागल साहेब हे श्री कराड सर यांना निरोगी, सुखी व समाधानी भावी जीवनाच्या शुभेच्छा देतांना भावूक व संवेदनशील झाले होते. श्री कराडकरला निरोप देतांना श्री बागल साहेबांचे अंत:करण गहिवरून आले होते; हे सर्वांना जाणवले. श्री बागल साहेबांनी जड अंत:करणाने शुभेच्छा देत अध्यक्षीय समारोप केला. श्री पी. बी. खिल्लारे सर, श्री यू. ई. वाघमारे सर, श्री व्ही. एम. वाटोडे सर यांनी छायाचित्रांकन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री एस. पी. देशमुख सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

CLICK TO SHARE