प्रतिनिधी अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली.वसमत तालुक्यातील टेंभुर्णी येथील शेतकरी सुभाष बाबूराव सवंडकर याचा पुराच्या पाण्यात बुडल्याने दुर्दवी मृत्यु झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडल्याने एकच खळबळ उडाली आहेअधिक माहिती अशी की वसमत तालुक्यातील टेंभूर्णी ते कुडाळा रस्ता येथे पुलं नसल्या कारणाने सुभाष बाबूराव सवंडकर हा सोमवारी सकाळी 10 च्या सुमारास बैलांचा सन पोळा असल्यामुळे शेतात जात असताना पाण्याचा अंदाज न लागल्याने पाण्यात पडून सवंडकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहेसदर पुला बाबत प्रशासनाला वेळोवेळी मागणी करूनही पुलाची मागणी पूर्ण न केल्या कारनाने आज सुभाष बाबूराव सवंडकर याला आपला जिव गमवावा लागल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे या बाबत पुढील कार्यवाही सुरु आहे