वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख सुरज शहा यांच्या प्रयत्नाला यश
प्रतीनिधी: शारुखखान पठाण वरोरा
चंद्रपूर:वरोरा आम आदमी पार्टीच्या वतीने नागपूर-चंद्रपूर हायवेवरील गड्डे मुक्त करण्यासाठी नंदुरी टोल नाक्यावर दोन आठवडे आधी दिलेल्या निवेदनाला प्रतिसाद मिळाला आहे. पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी अनेकदा या विषयावर प्रशासनाकडे लक्ष वेधले होते. नागरिकांच्या तक्रारी आणि स्थानिकांच्या मागणीनुसार, अखेर प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. नागपूर-चंद्रपूर हायवे हा वाहतुकीसाठी महत्त्वाचा मार्ग असून, रस्त्यावरील गड्ड्यांमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघातांच्या घटनांमध्ये देखील वाढ होत होती. या परिस्थितीला बदलण्यासाठी आम आदमी पार्टीने नंदुरी टोल नाक्यावर निवेदन देऊन रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. रस्त्याच्या कामाची सुरुवात होत असल्याने आता प्रवाशांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल अशी अपेक्षा आहे. आम आदमी पार्टी स्थानिक प्रशासनाकडून रस्त्याचे काम जलद गतीने आणि योग्य प्रकारे पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त करते. यापुढेही नागपूर-चंद्रपूर हायवेवरील गड्डेमुक्तीचे काम पूर्ण होईपर्यंत आम आदमी पार्टी स्थानिक पातळीवर लक्ष ठेवून राहील आणि आवश्यक त्या ठिकाणी आवाज उठवत राहील.