शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
बल्लारपूर : एका अल्पवयीन मुलीवर प्रेम प्रकणातुन लैंगिक शोषण केले आहे आरोपी ने त्या मुलीला जबरदस्तीने लाॅज वर नेऊन तिच्या सोबत लैंगिक शोषण केले.या प्रकरणी मुलीच्या आत्याने पोलिस स्टेशन येथे तक्रार केली त्यावरून पोलिसांनी आरोपी १९ वर्षीय शिवम दिनेश दुपारे रा.मौलाना आझाद वार्ड याला अटक केली.आरोपी विरुद्ध पाॅस्को ४ (१) व बीएनएस २०२३ ६४ (१)कलम अंतर्गत कारवाई केली आहे.सदर प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलीने मानसिक तणावातून आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास आपल्या राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.तिच्या आत्महत्येने शहरात खळबळ माजली आहे.लोकांची ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण झाले होते. तिच्या शवला शवविच्छेदना करीता चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. या प्रकरण विषयी अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, दिपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पीडित अल्पवयीन मुलीचे घरी भेट दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा नैताम, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे करीत आहे. पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांनी सांगितले की पोलीस बारकाई ने तपास करीत असून शांती लॉज चे मालक व व्यवस्थापक वर कारवाई करण्यात येईल. पीडित अल्पवयीन मुलीचे आत्महत्या प्रकरणी आरोपीला शिक्षा झाली पाहिजे म्हणून मनसे जिल्हा उपाध्यक्ष विष्णू बुजोने, शहर युवा अध्यक्ष उमेश कुंडले, महिला अध्यक्ष अरुणा तोडसाम तसेच कार्यकर्ते, वंचित युवा आघाडीचे अभिलाष चूनारकर, अश्विन शेंडे यांनी ठाणेदार सुनील गाडे यांची भेट घेतली.