तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर
दिनांक 4 /9/ 2024 रोजी बुधवार ला यशवंत प्राथमिक शाळा अल्लीपुर येथे तान्हा पोळ्याचे आयोजन व शेतकरी पालक वर्गांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सतीश काळे तसेच यशवंत प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ नंदुरकर मॅडम यशवंत हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ ढोकणे मॅडम तसेच शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका कोपरकर मॅडम तसेच शाळेतील शिक्षक श्री बाळासाहेब पाटील श्री कैलास नागरे श्री दिनेश कुमार काळे तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते. नंदीबैल सजावट व वेशभूषा यातून प्रथम द्वितीय व तृतीय बक्षीस देण्यात आले तसेच प्रोत्साहन बक्षीस देण्यात आले. व शेतकरी पालक वर्गाचा सत्कार करण्यात आला. व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.