मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन आई वडीलांची 15 कि.मी पायपीट

अन्य

जिल्हा प्रतिनिधी:विभा बोबाटे गडचिरोली

गडचिरोली : तापाच्या उपचारासाठी डॉक्टरऐवजी पुजाऱ्याकडे गेलेल्या दोन चिमुकल्या भावंडांचा काही तासांच्या अंतराने संशयास्पद मृत्यू झाल्याने गडचिरोलीत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर जन्मदात्यांनी रुग्णालय गाठले, पण उशीर झाला होता. वेळेवर शववाहीका उपलब्ध नसल्याने मृतदेह खांद्यावर घेऊन जड पावलांनी १५ किलोमीटर पायपीट करत त्यांनी घर गाठले. अहेरी तालुक्यातील पत्तीगाव येथील या घटनेची ४ सप्टेंबरला चित्राफित सार्वत्रिक होताच हळहळ व्यक्त होत आहे. बाजीराव रमेश वेलादी (६ वर्षे) व दिनेश रमेश वेलादी (साडेतीन वर्षे, दोघे रा. येर्रागड्डा ता. अहेरी) अशी त्या दुर्दैवी भावंडांची नावे आहेत. पत्तीगाव हे त्यांचेआजोळ आहे. दोन दिवसांपूर्वी आई- वडिलांसमवेत ते पत्तीगावला आले होते. ४सप्टेंबरला बाजीरावला ताप आला. पाठोपाठ दिनेशही आजारी पडला. आई-वडिलांनी त्यांना पत्तीगाव परिसरातील एका पुजाऱ्याकडे नेले.तेथे त्यांना जडीबुटीदेण्यात आली. त्यानंतर काही वेळातच दोघांचीही प्रकृती अधिकच खालावली.सकाळी साडेदहा वाजता बाजीरावचा मृत्यू झाला, त्यानंतर दुपारी १२ वाजता दिनेशनेही प्राण सोडले.जिमलगट्टा आरोग्य केंद्रातून पत्तीगावला जाण्यासाठीपक्का रस्ता नाही, त्यामुळे या चिमुकल्यांना खांद्यावर घेऊन आई- वडिलांवरनाल्याच्या पाण्यातून व चिखलातून वाट काढण्याची वेळ आली. दोन्ही भावंडांच्यामृत्यूने वेलादी दाम्पत्याला शोक अनावर झाला. मात्र,भाबड्या आशेपोटी दोन्हीमुलांना घेऊन दाम्पत्य जिमलगट्ठा प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले.

CLICK TO SHARE