यशवंत विद्यालय अल्लिपुर येथे रॅली काढून संविधान दिवस उत्साहात साजरा

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

भारतीय संविधान हा भारताचा पायाभूत कायदा आहे .२६ नोव्हेंबर १९४९ ला भारतीय संसदेने राज्य घटनेचा स्वीकार केलाआणि २६ जानेवारी १९५० पासुन भारताची राज्यघटना अंमलात आली. या दिवसाचे महत्त्व विद्यार्थ्यांना उमगण्यासाठी स्थानीक यशवंत विद्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्षा मुख्याध्यापिका स्मिता ढोकणे होत्या अथिती शिक्षक भोयर , सोळंकी व अंड्रस्कर हे होते.उपस्थित सर्व मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी सर्वांनी भारतीय संविधानाच्या उद्येशिकेचे वाचन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्मिता ढोकणे मॅडम यांनी संविधानाचे सारांश, स्वरूप व महत्व विषद केले. अतिथी भोयर सर यांनी सांगितले की जेव्हा जनमानसात समता , बंधुता व धर्मनिरपेक्षता अंगी यायला लागेल तेव्हा संविधान दिवस सार्थक होईल.सोळंकी सर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरयांचे विचार आचरन्यात आनावे वभारतीय संविधानाचा सन्मान करावा , असे आवाहन केले. यावेळी गावातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात आली सदर रॅलीमध्ये महाविद्यालयाचे शिक्षक , शीक्षकेत्तर कर्मचारी , विद्यार्थी , विद्यार्थिनी उपस्थीत होते.

CLICK TO SHARE