धर्मदाय आयुक्त यांच्या शेड्युलच्या प्रतीमध्ये नियमबाह्य फेरफार केल्या प्रकरणी 7 जणांवर कार्यवाही

क्राइम

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

स्थानिक माहेश्वरी युवक मंडळाचे ट्रस्ट तसेच धर्मदाय आयुक्त यांच्या शेड्युलच्या प्रतीमध्ये नियमबाह्य फेरफार केल्या प्रकरणी 7 जणांवर हिंगणघाट पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक रहिवासी रामकुमार जुगल किशोर डागा, विनोद अशोक मोहता, मुरली रामचंद्र लाहोटी, संजय गणेशीराम डालीया, आशिष वल्लभदास राठी, उदय मोहता, प्रेमकुमार विजयसिंग राजकुमार जाजु यांनी माहेश्वरी युवक मंडळाचे ट्रस्ट आणि धर्मदाय आयुक्त यांनी शेड्युलच्या प्रतीमध्ये फेरफार केला आहे. आणि शेड्युल 1 मध्ये त्यांनी नावे समाविष्ट केली. ते ट्रस्टचे विश्वस्त असल्याचे दाखवुन त्यानुसार फसवणुक केली. स्थानिक माहेश्वरी युवक मंडळाचे मारोती वार्ड येथील ट्रस्ट यांचे तक्रारी वरुन 420,463,464,465,468,471 गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे. या अगोदर महेश ज्ञानपीठच्या प्राचार्य वैशाली पोळ यांचेवर 25 ते 30 लाखाचा अपहार केल्याप्रकरणी 420,406 गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्यांच्यावरच 420 फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला.

CLICK TO SHARE