विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर येथील इंदिरा गांधी विद्यालय व्दारे विज्ञान प्रदर्शनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी अनेक प्रात्यक्षिके मॉडल तयार केले चंद्रयान शिवनेरी किल्ला, रायगड, कटर मशीन असे अनेक मॉडेल विज्ञान प्रदर्शनी मध्ये विद्यार्थ्यांनी तयार केले. या विज्ञान प्रदर्शनी मध्ये एकूण 40 मॉडेल मुलांनी तयार केले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य अर्चना मुडे यांनी केलेत. विज्ञान प्रदर्शन मध्ये प्रमुख मान्यवर म्हणून गावातील सरपंच तथा सदस्य सहभागी झाले होते.

CLICK TO SHARE