शहालंगडी देवस्थानाचे महंत वासुदेव महाराज ब्रह्मलीन

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लीपुर

र्हिंगणघाट:पंचमुखी हनुमान मंदिर देवस्थान शहालंगडीचे महंत श्री वासुदेव महाराज यांचे आज दुपारी 3 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे वय 70 वर्ष होते. त्यांचे पार्थिव शहालंगडी देवस्थान येथील मंदिराच्या सभागृहात भाविक भक्तांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आलेले असून दि 30 नोव्हेबरला दुपारी 3 वाजता त्यांना या सभागृहातील श्री संत लहानुजी महाराज यांच्या मूर्तीच्या शेजारी त्यांना समाधी देण्यात येणार आहे. संत वासुदेव महाराज हे तालुक्यातील चिकमोह या गावचे होते. या देवस्थानाचे तत्कालीन महंत श्री नागाबाबा यांनी त्यांच्या आई वडिलांच्या परवानगीने त्यांना शहालंगडी या ठिकाणी श्री वासुदेव महाराज यांच्या वयाच्या सहाव्या वर्षी आणले. संत नागाबाबा यांच्या निर्वाण नंन्तर ते या मंदिराचे महंत झाले. अंतिम श्वास घेत पर्यंत त्यांनी या मंदिराला एक उत्तम नावलौकिक मिळवून दिला होता. त्यांच्या महानिर्वाणचे वृत्त कळताच त्यांच्या मोठ्या संख्येने असलेल्या भक्त परिवारावर मोठे दुःखाचे सावट निर्माण झाले असून त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच गर्दी उसळलेली आहे.

CLICK TO SHARE