दावसा येथील माजी सरपंच वर गुन्हा दाखल.

सोशल

ग्राम सेविकेला शिवीगाळ व छेड छाड केल्याचा आरोप

प्रतिनिधी:साजिद खान नागपुर

जलालखेडा (ता.29) दावसा येथील माजी सरपंच यीरेश देविदास सावरकर यांच्या विरुद्ध बुधवारी दावसा येथील ग्राम सेविका मनीषा मोरे यांना शिवीगाळ व छेड छाड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दावसा ग्राम पंचायतच्या ग्राम सेविका मनिषा अनिल मोरे, वय 41 वर्ष, रा. पारडी बोरांग ता. वरुड 2022 पासून ग्राम पंचायत दावसा येथे ग्राम सेविका म्हणून कार्यरत आहे. 2022 मध्ये यीरेश देविदास सावरकर हे सरपंच पदावर कार्यरत होते. डिसेंबर 2022 पासून ज्योती नामदेव दरडे यांनी सरपंच पदावर कार्यभार सांभाळत आहे. यीरेश देविदास सावरकर यांचे काळात ग्रामपंचायत दावसा यांनी स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत कंपोस्ट खत खड्डे व शोष खड्याचे स्वच्छ भारत मिशन फंडातुन सन 2019- 20 मध्ये कामाला सुरवात केली होती. परंतु आज पर्यंत कामपूर्ण केल्या बाबतचे प्रमाणपत्र सादर केले नाही. ते काम अंदाजे 5 लक्ष रुपयाचे असुन ते काम पुर्ण न झाल्याने त्याचे पैसे भारत मिशन फंडातुन प्राप्त झाले नाही. या कामाच्या बिलाचे पैसे बाबत मला नेहमी ग्रामपंचायतमध्ये येवुन विचारपुस करतात व माझे सोबत अरेरावीची भाषा करतात व मला शासकीय कामकाजाचे वेळेनंतर मला फोन करतात व मला धमकी देतात असा आरोप ग्राम सेवक मनीषा मोरे यांनी केला आहे. बुधवारी सकाळी 10.45 दरम्यान ग्राम सेविका मनीषा मोरे ग्राम पंचायत येथे आल्या असता सरपंच ज्योती नामदेव दरडे या सुध्दां तिथे हजर होत्या त्याच वेळेस माजी सरपंच यीरेश देविदास सावरकर ग्राम पंचायतमध्ये आले व गावातील लोकांचे सिंचन विहरीचे प्रस्तावर सही का केली नाही या कारणावरुन ग्राम सेविका मनीषा मोरे, सरपंच व रोजगार सेवक शुभम बलदेव कोहरे यांना शिवीगाळ केली. त्यावर मनीषा मोरे यांनी पंचायत समीती नरखेड येथे जावुन तुम्ही चौकशी करा मी सदर प्रस्ताव माझे सहीने पाठविला आहे असे सांगितले. त्यावर यीरेश सावरकर यांनी सरपंच तुमचे हातचे बावले आहे. तुम्ही सांगाल ते करतील असे म्हटले तसेच ग्राम सेविका मनीषा मोरे यांना शिवीगाळ केली तसेच तुझी लायकी आहे का असे म्हणुन मोबाईल हिसकावुन घेतला. तसेच अंगावर असलेली ओढणी ओढली. झालेला प्रकार ग्राम सेविका यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं व माजी सरपंच यीरेश यांचे विरुध्द पोलीस स्टेशन जलालखेडा येथे तक्रार दाखल केली. माजी सरपंच यीरेश देविदास सावरकर यांच्या विरुद्ध कलम 353, 294, 354, 427, 506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून सूचना पत्रावर त्यांची सुटका करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार चेतनसिंह चौहान यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपनिरीक्षक मनोज शेंडे व जलालखेडा पोलिस करत आहे.बॉक्स, माझ्या केलेल्या कामाचे बिल काढून मला पैसे द्यावे यासाठी मी ग्राम पंचायत कार्यालयात गेलो होतो. मी कोणालाही शिवीगाळ केलेली नाही. माझ्यावर राजकीय दृष्टी कोनातून चुकीचे व खोटे आरोप लावण्यात आले आहे.यीरेश सावरकर माजी सरपंच दावसा

CLICK TO SHARE