शेतकऱ्याच्या पत्नीची विष प्राशन करून आत्महत्या

सोशल

उषा सदाशिव गवळी असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव.

प्रतिनिधी:साजिद खान नागपुर

जलालखेडा ( त.29) नरखेड तालुक्यातील दातेवाडी येथील शेतकरी सदाशिव गवळी यांच्या पत्नी उषा सदाशिव गवळी वय वर्ष 47 रा. दातेवाडी यांनी बुधवारी विष प्राशन करून आत्महत्या केली. सदाशिव नेहमी प्रमाणे शेतात गेले होते त्यांच्या पत्नी घरी होत्या. सदाशिव सायंकाळी 4 वाजता शेतातून घरी परत आले असता त्यांना पत्नी खाली पडलेल्या दिसल्या लगेच त्यांनी गावातील नागरिकांच्या मदतीने जलालखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्य झाल्याचे सांगितले. विष प्राशन केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनेची माहिती जलालखेडा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी शव विच्छेदन गृहात ठेवण्यात आला आहे. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून जलालखेडा पोलिस पुढील तपास करत आहे.

CLICK TO SHARE