कुंतलापुर ज्ञानर्जन केंद्राची उत्कृष्ट वाटचाल

सोशल

काटोल.न.प. अंतर्गत कुंतलापुर ज्ञानार्जन केंद्राची सुरुवात

प्रतिनिधी:साजिद खान नागपुर

काटोल:दिनांक २६-११-२०२२ ला झाली सुरुवातीच्या काळात २०० च्या जवळपास विद्यार्थी अभ्यास करण्याकरिता यायचे परंतु ग्रंथपाल राजेंद्र राऊत यांनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांची संख्या 200 वरून 310 च्या वर नेली.या ग्रंथालयात अंगणवाडी सेविका पासून तर एमपीएससी, यूपीएससी,बँकिंग ,नेट-सेट, पोलीस भरती,आर्मी,नर्सिंग, इंजिनिअरिंग सारख्या विविध विभागाचे पुस्तके आहेत.या ग्रंथालयाची शिस्त ही फार चांगल्या प्रकारची असून येथे विविध गावातून विद्यार्थी अभ्यास करण्याकरिता येतात व ते या ग्रंथालयात प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थी हे महिना महिना प्रवेशाची वाट पहात असतात. ही जमेची बाजू आहे. हे ग्रंथालय सुरू होवून १५ ते १६ महिने इतका कालावधी झाला असून येथील आजपर्यंत ५० च्या वर विद्यार्थी नोकरीवर रुजू झाले. कुमारी सृष्टी दिवाकर नागपुरे ही आरटीओ इन्स्पेक्टर म्हणून नियुक्त झालि आहे.संतोष जनार्दन आंधळे हे पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती झाले आहे. दुर्गेश राजेंद्र पावडे, मयुरी राजेंद्र उमप,माधुरी बबनराव कोडे यांची निवड एमपीएससी ग्रुप सी मार्फत मुंबई मंत्रालय ऐथे (क्लर्क )म्हणून झालेली आहे. पूनम रविश रामटेके महाराष्ट्र बँक मध्ये मॅनेजर या पदावर नियुक्ती झालि आहे.आनिकेत केशव कळमकर, अविनाश रामराव कातलाम, एसबीआय बँक मध्ये क्लर्क या पदावर नियुक्ती झाली. कु. श्वेता संजय जुनघरे R.R.B.PO बँक मध्ये नियुक्ती झाली तर संजय देवराव मळगणे यांची निवड नाशिक विद्यापीठ रोखपाल म्हणून झाली. रोशन मनोहर डोंगरे ,प्रणाली लीलाधर धोटे ,रोशन हिराचंद बेलखेडे, प्रफुल राजूजी भांगे,अजय कृष्णाजी बागडे, नीलिमा रुपेश देशभ्रतार, यमु वासुदेव नंदगळे यांची निवड महाराष्ट्र पोलीस मध्ये झाली आहे. हर्षल रामभाऊ वरुडकर, निलेश जीवनराव रेवतकर, प्रकाश वसंतराव पाचोडे यांची निवड इंडियन आर्मी मध्ये अग्नीर म्हणून झाली आहे.सचिन रमेशराव पुरी यांची निवड बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) मध्ये झाली. आकाश हरिश्चंद्र साबळे लोको पायलट इंडियन रेल्वे या पदावर नियुक्ती झाली आहे. घनश्याम महादेव बाविस्कर, लक्ष्मीदास अशोकराव भालेराव, प्रीतम दिलीप कीटुकले,जावेद रफीक शेख या सर्वांची इंडियन रेल्वे मध्ये निवड झाली .सागर लालाजी चरफे,आकाश विठ्ठल नासरे, ऐश्वर्या सुनील चौधरी, योगिता विठ्ठलराव वानखेडे,या सर्वांची निवड एसएससी जीडी मध्ये झाली आहे .रोशनी गणेशराव जाधव, हरीश शंकरराव फुके,चंद्रशेखर प्रल्हादराव सहारे, आकाश खुशालराव पाटील हे कोतवाल म्हणून कार्यरत आहे.पोलीस पाटील म्हणून अमोल सूर्यभान गजभिये,मयूर मोरेश्वर उताणे, आसिफ अन्वर शेख,रुपेश शेषराव देशभ्रतार,सागर शरदराव पुणेवार,योगेश पुरुषोत्तम कोल्हे हे ग्रंथालयातून अभ्यास करून कर्तव्यावर आहे या ग्रंथालयाची निर्मिती ही सत्ता पक्ष नेते चरणसिंगजी ठाकूर यांच्या कल्पनेतून साखर झाली असून असे ग्रंथालय बघण्याकरिता विविध विभागाचे पदाधिकारी येथे येत असतात व ग्रंथालयाची शिस्त स्वच्छता व ग्रंथालयातील अभ्यासकांना पाहून अभ्यास करताना बघून आनंदित होतात व आपल्या शहरात पण असे ग्रंथाला हवे असे बोलून जातात ही खरोखरच काटोल शहराच्या दृष्टीने आनंदाची बाब आहे

CLICK TO SHARE