महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची नास्त्ता लूट थांबवनारी प्रवासी योजना

सोशल

(एस टी बसेस अल्पोपहारासाठी थांबतात ,अशा अधिकृत बस थांब्यावर )

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपूर

एस.टी ने प्रवास करत असतांना जेवणाकरिता बस ज्या हॉटेलवर स्टॉप घेते तिथे आपण काढलेले तिकिट दाखवून रुपये ३०/- मध्ये शिरा , पोहे , उपमा , वडा पाव , ईडली , मेदु वडा यापैकी काहीही एकच नास्ता अधिक चाहा घ्यावा… आणि जर त्या हॉटेल चालकाने जास्तीचे पैसे मागितल्यास सदर थांबा रद्द होऊ शकतो तसे केल्यास खालील नंबर वर संपर्क करून आपण कोणत्या बस ने प्रवास करत आहोत, बस नास्त्ता किंवा जेवणासाठी ज्या हॉटेल वर थांबली आहे त्या हॉटेलचे नाव व त्या मालकाचे नाव सांगून एस.टी. महामंडळाच्या मुख्य कार्यालय येथे या ०२२ -२३०७५५३९ नंबर वर संपर्क करावा. व तशी त्रकार करावी.. असा महत्वपूर्ण निर्णय प्रवाशां करीता रा . प . महामंडळाने घेतला आहे. .

CLICK TO SHARE