बल्लारपूर पॉवर हाउस च्या पौराणिक लुम्बिनी बुद्ध विहार परिसरामध्ये बुद्ध वंदना

सोशल

बल्लारपूर पॉवर हाउस च्या पौराणिक लुम्बिनी बुद्ध विहार परिसरामध्ये भर पावसात 14 वर्ष नंतर….बुद्धम शरणम गच्छामि …धम्माम शरणम गच्छामि…संघम शरणम गच्छामि….

मोहम्मद नासिर बल्लारपुर तालुका प्रतिनिधि

चंद्रपूर दि 27 नोव्हेंबर 2023 सोमवार ला कार्तिक पौर्णिमा च्या निमित्ताने भारतीय बौद्ध महासभा जिल्हा चंद्रपूर पश्चिम तसेच बल्लारपूर शहर व तालुका शाखा आणि विसापूर ग्राम शाखा च्या वतीने बल्लारपूर पॉवर हाउस च्या पौराणिक लुम्बिनी बुद्ध विहार परिसरात सामूहिक बुद्ध वंदना व सुत्तपठण चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. सोमवार ला सकाळ पासूनच सतत पाऊस सुरू होता. भर पावसामध्ये भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी परिवारा सह उपस्थित झाले. बल्लारपूर, चंद्रपूर आणि विसापूर येथील बौद्ध उपासक उपासिका यांनी भर पावसात मोठया संखेने उपस्थित दर्शवली आणि नियोजित ठरविलेल्या प्रमाणे सकाळी 10.30 वा या निसर्गरम्य पौराणिक लुम्बिनीनिसर्गरम्य पौराणिक लुम्बिनी बुद्धविहाराच्या परिसरामध्ये हा कार्यक्रम ला सुरुवात करण्यात आली. प्रथमता जिल्ह्याचे अध्यक्ष इंजी. नेताजी भरणे तसेच जिल्हा सरचिटणीस ऍड जगदीप खोब्रागडे यांनी बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भ. गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पमाला टाकली आणि अगरबत्ती आणि मोमबत्ती प्रज्वलित केली उपस्थित सर्वांनी पुष्प अर्पण केले आणि आद कृष्णाक पेरकावर बौध्दचार्य, केंद्रीय शिक्षक यांनी सर्वांना त्रिशरण पंचशील दिले तसेच सामूहिक सुत्त पठण गाथा घेण्यात आली. तब्बल 14 वर्ष नंतर या ठिकाणी….बुद्धम शरणम गच्छामि… धम्मम शरणम गच्छामि..बुद्धम शरणम गच्छामि… धम्मम शरणम गच्छामि.. संघम शरणम गच्छामि… च्या पवित्र शब्दांनी या परिसरातील सर्व वातावरण धम्ममय झाले.बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आद डॉ भीमराव यशवंत आंबेडकर साहेब यांनी बौद्ध धम्माच्या लेणी, शिलालेख तसेच जीर्ण झालेले पौराणिक बुद्ध विहारे यांना पुनर्जीवित करणे त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारतीय बौद्ध महासभेने प्रत्येक जिल्यात करावी असे आदेश दिले. यांचाच आदेशाने चंद्रपर जिल्हा शाखेच्यावतीने बल्लारपूर पावर हाऊस कॉलनी येथील जीर्ण असलेले पौराणिक लुम्बिनी बुद्ध विहार या ठिकाणी कार्तिक पौर्णिमेला सामूहिक बुद्ध वंदना व सुत्त पठण चा कार्यक्रम घेण्याचे ठरलेले होते.याप्रसंगी या बल्लारपूर पॉवर हाउस कॉलनी च्या विहाराचे संगोपन करणारे आद सिद्धार्थ देशभ्रतार व त्यांचा परिवार यांचे भा बौ म चंद्रपूर जिल्ह्या च्या वतीने “बुद्ध अँड हिज धम्म” हा ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला तसेच विसापूर ग्राम शाखा चे अध्यक्ष आद संजय वानखडे साहेब, आद स्वप्निल पुणेकर सचिव व सर्व पदाधिकारी यांनी हा परिसर साफसफाई करून सर्व व्यवस्था केली यां सर्वांचे चंद्रपूर जिल्ह्या शाखा च्या वतीने “बुद्ध अँड हिजधम्म” ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला. बल्लारपूर तालुका शाखा च्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.तालुक्याचे अध्यक्ष एड रमण पुणेकर तसेच बल्लारपूर शहराच्या अध्यक्ष आयुनी गायत्री ताई रामटेके यांचा सुद्धा “बाबासाहेबांचे समता सैनिक दल” हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.या ठिकाणी 14 वर्ष अगोदर असलेली भारतीय बौद्ध महासभा,पॉवर हाउस कॉलनी बल्लारपूर ची कार्यकारिणी नव्याने गठीत करण्यात आली .आद सिद्धार्थ देशभ्रतार अध्यक्ष,आद एफ टी गेडाम सरचिटणीस, आद पंढरीनाथ पिसे कोषाध्यक्ष मनुन ऍड रमण पुणेकर बल्लारपूर तालुका अध्यक्ष यांनी सर्वांच्यातालुका अध्यक्ष यांनी सर्वांच्या उपस्थिती मंध्ये जाहीर केली. यया प्रसंगी आद बादल देशभ्रतार यांनी मागील 25,30 वर्षा च्या अगोदर लुम्बिनी बुद्ध विहार व या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा च्या होणाऱ्या कार्य बाबत ची सर्व माहिती दिली. तसेच 14 एप्रिल 1978 ला आद वासनिक, ज्यू इंजिनिअर यांनी तथागत भ.बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो भारतीय बौद्ध महासभा बल्लारपूर पॉवरहाऊस शाखेला दिले याची माहिती दिली.या नंतर आद नेताजी भरणे जिल्हाध्यक्ष भा बौ म चंद्रपूर पश्चिम यांनी मनोगत व्यक्त करताना जीर्ण झालेल्या लुम्बिनी बुद्ध विहार च्या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा च्या संकल्पना तीबौद्ध महासभा च्या संकल्पना तील महाविहार तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे बौद्ध धम्माचे प्रचार केंद्र करण्या करिता या जागेची रीतसर मागणी शासनाला करण्यात येईल असे मत व्यक्त केले. शेवटी आयुनि गायत्री ताई रामटेके अधक्ष्या बल्लारपूर शहर यांनी सर्वांचे आभार मानले. शेवटी संस्थेच्या नियम प्रमाणे सरणत्य घेऊन या कार्यक्रम ची सांगता झाली.जोरदार पाऊस व थंडगार हवा सुरू असताना सुद्धा सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. कार्तिक पौर्णिमा च्या पवित्र दिनी चंद्रपूर जिल्हा शाखा च्या वतीने सर्वाना खीर व नास्ता ची व्यवस्था केली होती. या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेलेचंद्रपूर-ऍड जगदीप खोब्रागडेजिल्हा सरचिटणीस, आद संदीपसोनोने जिल्हा उपाध्यक्ष,आदप्रफुल भगत जिल्हा उपाध्यक्ष,आयुनि सपना कुंभारे जिल्हाउपाध्यक्ष, आद अशोक पेरकावारलेफ्टनंट कर्नल,आद कृष्णाकपेरकावार, आद भीमलाल सावमाजी जिल्हाध्यक्ष, आद किशोरतेलतुंबडे सरचिटणीस चंद्रपूरशहर,आद भाऊराव दुर्योधनचंद्रपूर शहर उपाध्यक्ष, आद संकेतजयकर उपाध्यक्ष तथा कंपनीलीडर,केंद्रीय शिक्षिका आयुनिलता ताई साव, आयुनि कविताअलोने, आयुनि कांता मुन, आदमहेश कुंभारे साहेब,आद जीवनदास अलोने साहेब. बल्लारपूर-केंद्रीय शिक्षिका आयुनि अनुकला वाघमारे,आयुनि संगीता शेंडे,आद दुरेश तेलंग,आद अजयचव्हाण, आद देवगडे साहेब, आद जांभुलकर साहेब, आद रवी मेश्राम साहेब, आद प्रसाद चव्हाण साहेब.विसापूर-आद संजय वानखेडे, आद स्वप्नील पुणेकर, आद किरण पुणेकर,राजुरा-आद धरमुजी नगराळे तालुका अध्यक्षआणि 150 ते 200 धम्म उपासक, उपसिका ची उपस्थिती होती….

CLICK TO SHARE